तळेगाव दाभाडे:
पोलीस स्टेशन हद्दीतील तळेगाव स्टेशन येथील नगरपरिषद तळे येथे पूरजन्य परिस्थिती ,आपातकालीन परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापना बाबत प्रात्यक्षिक करण्यात आले.

ग्राम सुरक्षा दल सदस्य, वन्यजीवन रक्षक मावळ संस्था व राणीॲम्बुलन्स ,विरा ॲम्बुलन्स बोटच्या सभासदांनी या प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. एखादा व्यक्ती बुडाल्यास त्याला कसे वाचवायचे याचे डेमो द्वारे प्रशिक्षण देण्यात आले तसेच नागरिकांना देखील सदरचा डेमो दाखवण्यात आलेला आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक सत्यवान माने,पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर पाटील, सहाय्यक फौजदार शेळके, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गोरे, कृष्णा कातकडे ,महिला पोलीस अर्चना पानसरे ,वैशाली बोरकर ,प्रियंका नाईक, प्रशांत वाबळे,बाबाराजे मुंडे, कृष्णा  व इतर  पोलीस स्टाफ उपस्थित होता.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे,  संस्थेचे आपत्ती व्यावस्थापन सर्च आणि रेस्कु टिमचे अध्यक्ष गणेश निसाळ ,भास्कर माळी,जीगर सोळंकी,सर्जेस पाटिल, विनय सावंत,शुभम काकडे,सार्थक घुले,गणेश गायकवाड,अविनाश कार्ले,गणेश सोंडेकर,विकी दौंडकर,कुनाल दाभाडे ,श्रीयस भेगडे,सुरज शिंदे ,प्रशांत शेडे,गौरव चेपे,गणेश ढोरे सहभागी झाले होते.

रेस्कु टिमचे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी आभार मानले.

error: Content is protected !!