१५ जुलै रोजी संत नामदेव महाराज पालखी सोहळा
पिंपरी:
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने शनिवार, दिनांक १५ जुलै २०२३ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता भव्य पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

श्री मोरया गोसावी मंदिर – गांधी पेठ – चापेकर चौक – वाल्हेकरवाडी रस्ता – संत नामदेव चौक – साठे मळा – संत नामदेव महाराज मंदिर, चिंचवड या मार्गाने नूतन अन् सुंदर पालखीमध्ये नामदेव महाराजांच्या पादुका ठेवून ही मिरवणूक संपन्न होईल.

त्यापूर्वी सकाळी ८:०० ते ९:०० या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री नामदेव महाराज यांच्या मूर्तींना संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर धार्मिक पूजाविधी करण्यात येतील. पालखी सोहळ्यात गजानन महाराज हरिपाठ भजनी मंडळ भजनसेवा रुजू करतील. दुपारी ठीक १२:०० वाजता पुष्पवृष्टी आणि त्यानंतर महाप्रसादाने समाधी सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे; तसेच संस्थेच्या सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात येईल. सर्व भाविकांनी पारंपरिक वेषभूषा परिधान करून सहकुटुंब या सोहळ्याचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते आणि मंदिर कार्यकारिणी  यांनी केले आहे.

error: Content is protected !!