शांती हेच खरे ऐश्वर्य व खरी संपत्ती
मानवी जीवनात पैशाला इतके महत्त्व दिले गेलेले आहे की, पैसा हेच माणसाचे सर्वस्व होऊन बसलेले आहे.असे घडण्याचे प्रमुख कारण हे की पैशाच्या बळावर माणसाला सर्व काही विकत घेता येते.इतकेच नव्हे तर माणसाला सुद्धा विकत घेण्याचे सामर्थ्य पैशात आहे.पैशासाठी माणसे अक्षरश: वेडीपिसी होतात आणि त्यापायी ते स्वतःला जीवनात हरवून बसतात.
पैसा हे साधन आहे,साध्य नाही ही महत्त्वाची गोष्ट विसरल्यामुळेच सर्व अनिष्ट प्रकार घडत असतात. पैशासाठी सर-सर,मरणाऱ्या माणसांना पैशाने मिळणाऱ्या संपत्तीचा उपभोग घ्यावयास मरेपर्यंत वेळच मिळत नाही.त्यांनी मिळविलेला पैसा मात्र इतरांच्याच कामी येतो व प्रत्यक्षात ती माणसे पैशाचा दुरूपयोग करून कामातून जातात. थोडक्यात,पैशाचा हव्यास सर्वाच्याच नाशास कारणीभूत ठरत असतो.
*जीवनात पैसा अत्यंत आवश्यक आहे हे खरे परंतु त्याची मर्यादा ओळखणं बरे.*
*खऱ्या अर्थाने तोच श्रीमंत जो पूर्ण झाला निरासक्त.*
*Money is something but not everything.*
*पैशाची कमाई संसार सुखाचा करण्यास जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक महत्त्वाची आहे पुण्याईची कमाई.*
*पैसा ही लक्ष्मी नसून शांती ही खरी लक्ष्मी आहे.*
*शांती हेच खरे ऐश्वर्य व खरी संपत्ती तीच होय.*
*सुखसोय प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य पैशात आहे परंतु सुखशांती प्राप्त करून देण्यास पैसा असमर्थ ठरतो.*
*”जीवनात पैसा जितका आवश्यक आहे तितकेच पुण्यही आवश्यक असते” या सत्याची जाणीव मानव जातीला जेव्हा होईल,तेव्हाच विश्वात खरी क्रांती घडेल.*
*पैसा हा देव आहे जर त्याचा सदुपयोग केला तर पैसा हा दैत्य आहे जर त्याचा दुरूपयोग झाला तर.*
*पैसा हे सर्वस्व आहे असे माणसांना जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने सर्वस्वाला मुकत रहातील,हे निश्चित.*
*संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुद्धीला गंज चढवते,गांजा-अफू,दारू गर्द अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते आणि सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन पोहोचविते.*
*अनिष्ट व भ्रष्ट मार्गांनी मिळविलेला शापित पैसा तो मिळविणाऱ्यांना तापदायक तर ठरतोच,पण तो पैसा त्यांच्या मुलाबाळांना व पुढील पिढ्यांना वारसा हक्काने व निसर्गनियमानुसार अत्यंत कुशकारक, दुःखकारक व हानिकारक ठरतो.*
*”पैसा हाच देव व संपनी हीच लक्ष्मी”, असे माणसाला जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत माणसातील माणुसकी निर्माण होणार नाही व मानवजातीला अपेक्षित असलेले सुख-शांती समाधान कधीही प्राप्त होणार नाही.*
सद्गुरू श्री वामनराव पै
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्याच्या प्रा.अर्चना येवले यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
- आता सोडणार नाही रे मौका..रवि आप्पाचा वादा पक्का.. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी गाण्यातून रविंद्र भेगडेंचा धमाका
- कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
- दत्तात्रेय वाघमारेे यांचेे निधन
- दक्षिण कोरिया ची हुदांई स्टील तळेगाव दाभाडेत: आर एम के इंडस्ट्रियल पार्क मध्ये कार्यान्वित होणार