तळेगाव दाभाडे:
शिक्षकांनी नेहमी अद्यावत ज्ञान मिळवून विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मावळ तालुक्यातील मराठी माध्यमांच्या शाळांतील एस.एस.सी परिक्षेत गुणवंत विद्यार्थी व १०० टक्के निकाल लावलेल्या मुख्यध्यापकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमांच्या वेळी साळुंखे बोलत होते. पुढे बोलताना साळुंखे म्हणाले की, शिक्षकांनी नेहमी अद्यावत ज्ञान मिळवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले पाहिजे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून ज्ञानदानाचे पवित्र काम करा असा मोलाचा संदेश दिला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसचे उत्तम कामाबद्दल अभिनंदन केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मावळ
कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल, ट्रस्ट तळेगाव दाभाडे
रोटरी क्लब ऑफ व तळेगाव एम.आय.डी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने

कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे यांचे स्मरणार्थ आज मावळ तालुक्यातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ मध्ये तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक विद्यालयातील *प्रथम क्रमांक* प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यी *गुणगौरव समारंभ* तसेच १००% निकाल लावलेल्या शाळेतील *मुख्याध्यापकांचा सन्मान समारंभ* आयोजित करण्यात आला होता तालुक्यातील  शाळांमधील ६५ विद्यार्थी व शाळा सहभागी झाले होते तसेच तालुक्यातील मराठी माध्यमांच्या १०० टक्के निकाल लावलेल्या १५  मुख्याध्यापकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमासाठी पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश काशिद, जिल्हा कार्यवाह महेश शेलार, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे,शिक्षक परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब आगळमे,रोटरी क्लब ऑफ ३१३१चे उपप्रांतपाल शंकरगौडा हदिमनी, मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माळशिकारे सर, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सीचे अध्यक्ष राहूल खळदे,सचिव रो. सुनिल खोल्लम, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळचे अध्यक्ष लक्ष्मण मखर, कार्यवाह देवराम पारिठे उपाध्यक्ष सोपान असवले, श्रीनिवास गजेंद्रगडकर, धनकुमारशिंदे,कोषाध्यक्ष  राजेंद्रभांड ,सहकार्यवाह रियाज तांबोळी,रो. ममता कोल्हटकर. उपप्रांतपाल  रो. शंकर हदिमणी , रो. सुनील नाना भोंगाडे, रो. हिरामण बोत्रे,रो. सुदाम दाभाडे, रो. विन्सेंट सालेर, रो. अजय पाटील, सल्लागार  विलास भेगडे, धनंजय नांगरे , नारायण असवले , संजय वंजारे , रविंद्र शेळके उपस्थित होते.

संतोष खांडगे म्हणाले की,या पुढील शिक्षण उत्तम पद्धतीने पूर्ण करून आपल्या आई- वडिलांचे  स्वप्न पूर्ण करून देशाचा नावलौकिक वाढवावा .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी चे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण मखर यांनी केले सुत्रसंचालन भारत काळे व प्रभा काळे यांनी केले तर आभार रोटरीचे अध्यक्ष राहुल खळदे यांनी मानले.

error: Content is protected !!