तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विशाल वाळुंज यांची फेर निवड करण्यात आली, मावळ तालुका युवक काँग्रेस आयचे युवक अध्यक्ष राजेश वाघोले यांनी त्यांना फेरनिवडीचे पत्र दिले. गेल्या अनेक वर्षापासून विशाल वाळुंज काँग्रेस पक्षात सक्रीय आहे .

येथे झालेल्या बैठकीत  बहुसंख्य तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य करून भविष्यकाळात असंख्य तरुण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील असा विश्वास वाघोले आणि वाळुंज यांनी व्यक्त केला.युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

माजी सभापती राजेंद्र  दाभाडे,अँड. राम शहाणे , नितीन माने, विक्रांत वाळुंज ,प्रतीक बोर्डे ,हर्षद चव्हाण, हर्षद उबाळे भागवत मोरे उपस्थित होते. पीटर काळे यांची अल्पसंख्याक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .तालुका सरचिटणीस पदी हेमंत राऊत व निनाद हरपुडे यांची निवड करण्यात आली.पवन मावळ युवक काँग्रेस अध्यक्षपदी तेजस आढळगे. व प्रदीप शिंदे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

वाळुंज हे पुणे ग्रामीण सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष पदी कारभार सांभाळत असून युवक काँग्रेसचे अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. वाळुंज यांनी मोदी सरकारवर टीका केली.देशात सध्या २०१४. नंतरच्या काळामध्ये सुरू असलेलं भाजपचे केंद्रातील मोदी सरकार कशा पद्धतीने हुकूमशाही दडपशाही दंडेलशाही लूटपाट पिळवणूक अत्याचार अन्याय आणि एकंदरीतच या देशाला अडचणीत आणण्याचे काम करत आहे.

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या  पक्षांतर्गत राजकीय घडामोडी आणि पक्षीय बलाबल वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना काँग्रेस  पक्ष आपला वाटतो,काँग्रेसचा विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील रहा असे आवाहन वाघोले यांनी केले.

उद्योजक रामदास  काकडे यांनी नुकताच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत पर अभिनंदन ही करण्यात आले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख शंकर भेगडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!