वडगाव मावळ:
येथे  माझी वसुंधरा व स्वच्छ नाले सफाई (ओढे)अभियान फक्त जाहिरात बाजी साठी का? असा प्रश्न वडगाव शहर भाजपाचे शहर अध्यक्ष अनंता कुडे यांनी नगरपंचायत  सत्ताधारी व प्रशासनला विचारला आहे. कुडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रशासनाच्या उणिवांवर बोट ठेवले आहे.

कुडे म्हणतात की,वडगाव नगर पंचायत मधील सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी वर्षभरामध्ये राबविलेले माझी वसुंधरा अभियान व नाले सफाई यावर मोठया प्रमाणात प्रशासनाचा निधी खर्च केलेला असून, वस्तुस्थिती मध्ये मात्र वेगळेच चित्र पहायला मिळतय.

त्याचाच एक भाग म्हणून श्री.दत्त मंदिर जवळ वडगाव मधील प्रमुख असणारा गाव ओढा याठिकाणी मोठया प्रमाणावर झाडे तुटलेली आहे. त्याचा राढारोढा ओढ्यातच पडलेला दिसत असून, जो निसर्गिक ओढ्याच्या पाण्याचा स्त्रोत तात्पुरत्या चुकीच्या पद्धतीने आडविल्याने त्या ठिकाणी सुद्धा पाणी अडल्याने घाणीचे प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे .

सत्ताधारी यांनी केलेली कामे फक्त  जाहिरात बाजी साठीच आहेत का?  असा आमचा आरोप केला आला आहे.

तरी लवकरात राहिलेली कामे  पूर्ण करावीत, तसेच संपूर्ण गावामध्ये पावसामुळे होणारे सांडपाण्यावर त्वरित  औषध फवारणी करावी नाहीतर, वडगाव शहर भाजपा नगरपंचायतीवर वडगाव मधील विविध प्रश्न संदर्भात मोठे आंदोलन उभारू.

error: Content is protected !!