तळेगाव स्टेशन:
मावळ तालुक्यातील ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे यांचा मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. आप्पा या नावाने उद्योजक रामदास काकडे मावळ तालुक्यात सुपरिचित आहे. आप्पा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे सुतोवाच करताच काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

याच पार्श्वभूमीवर मावळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी काकडे यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले. यावेळी तळेगावचे माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काकडे यांचा काँग्रेस प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते.

दोन दिवसापूर्वी काँग्रेस नेते चंद्रकांत सातकर,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप ढमाले यांच्या सह अन्य काँग्रेस जणांच्या उपस्थित कान्हे फाटा येथील सातकर यांच्या कार्यालयात बैठक झाली आहे. काकडे यांच्या प्रवेशाने मावळातील काँग्रेसला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!