टाकवे बुद्रुक येथे सकाळी साडेसात वाजता पदाचाऱ्याचा अपघात
टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मधील एका टू व्हीलर वरती तीन युवक रात्रपाळी करून परतीच्या मार्गाने माघारी जात असताना टाकवे बुद्रुक येथे सकाळी साडेसात वाजता पदचारी व टू व्हीलर यांच्यामध्ये अपघात झाला या अपघातामध्ये पदचार्याचा पाय मोडला असून डोक्याला दुखापत झाली आहे.
दरम्यान हे पदाचारी अर्धा तास रस्त्यामध्ये पडून होते या ठिकाणी ॲम्बुलन्स उपलब्ध झाली नाही यावेळी गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी टाकवे बुद्रुक येथील गाडी मालक संभाजी शंकर असवले यांना फोन केला त्यावेळी तात्काळ ते गाडी सोबत उपलब्ध होऊन सदर व्यक्तीच्या कुटुंबीयांबरोबर जाऊन त्यांनी सदर व्यक्तीस अथर्व हॉस्पिटल या ठिकाणी नेऊन ऍडमिट केले आहे. पुढील उपचार अथर्व हॉस्पिटल मधील डॉक्टर करत आहेत.
दरम्यान टाकवे कान्हे फाटा रस्ता नव्याने डांबरीकरण झाल्याने या रस्त्यावरती गाड्यांच्या वेगाचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावरील गावाच्या भागातून गाड्यांचा स्पीड कमी होण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये मागील ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता, या रस्त्यांना चौकामधून स्पीड बेकर टाकण्यात यावे यासंबंधात सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत निवेदन देण्यात यावे मात्र ग्रामपंचायतीने पुढाकार न घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
येथून पुढे येणाऱ्या काळात असे अपघात होऊ नये यासाठी ग्रामपंचायत ने तात्काळ पावले उचलून संबंधित विभागाला चौकातून स्पीड बेकर टाकण्यासाठी निवेदने द्यावीत. असे टाकवे गावातील नागरिकांचे मत आहे.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन