टाकवे बुद्रुक:
मॉडेलिझ सेव द चिल्ड्रन यांच्या मार्गदर्शनखाली व भोयरे ग्रामपंचायत च्या वतीने शिरे उपकेंद्र अंतर्गत भोयरेत ओपीडीचे उदघाटन करण्यात आले.त्यामुळे स्थानिकांना गावातच आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

  माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माजी उपसभापती शांताराम  कदम  सरपंच कुलदीप बोडके,उपसरपंच नितीन बोडके,भाजपा टाकवे वडेश्वर गटाचे अध्यक्ष रोहिदास असवले, आंदर मावळ भाजपा अध्यक्ष गणेश कल्हाटकर,सरचिटणीस सचिन पांगरे, सरपंच लक्ष्मण तलावडे,उपसरपंच रविंद्र तलावडे, डॉ.शैलेश साठे सर,डॉ. धनवंती साळे ,अपर्णा जोशी ,कविता सानप ,पूनम गायकवाड, सीमा कणकुटे ,रविंद्र ठाकरे व सेव्ह द  चिल्ड्रन सर्व टीम, भोयरे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच वर्षा अमोल भोईरकर ,उपसरपंच ऋषिकेश खुरसूले ,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भोईरकर,रामदास भोईरकर,रंजना भोईरकर,दिपाली जांभुळकर,नीता भोईरकर,संगीता वाघमारे,अमोल भोईरकर,सुधीर भोईरकर,यादव आडीवळे ,प्रितम आडीवळे,शंकर भोईरकर ग्रामसेविका  प्रमिला सुळके,कॉन्ट्रॅक्टर करनकाळ, गायकवाड ,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
भोयरे व पंचक्रोशीतील गावातील वैद्यकीय सुविधांचा अभाव पाहता भोयरे गावातील सरकारी दवाखाना चालू झाल्याने नागरिकांना रूग्ण सेवा गावात  मिळणार आहे.येत्या काळात भोयरे या ठिकाणी उपकेंद्र मंजूर करून नागरिकांना मोफत सुविधा देण्यावर प्रयत्न करणार असल्याचे  अमोल भोईरकर यांनी आपल्या मनोगतात म्हटले.

error: Content is protected !!