रायगड:
रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुम्मापट्टी ता कर्जत जि.रायगड या शाळेतील इ.१ ली ते इ ७ वी पर्यंतच्या १५५ विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली.

तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाषाणे ता. कर्जत जि रायगड*या शाळेतील  इ १ ली ते इ ७ वी पर्यंतच्या १२७ विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप केले.या दोन्हीही शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे.यामध्ये पाटी पेन्सिल रंगपेटी कंपासपेटी शिसपेन्सिल,वह्या पुस्तके खोडरबर असे साहित्य दिले.

फेसबुक आणि वाॕटसपच्या माध्यमातून आणि संस्थेच्या सभासदांच्या सहकार्यातुन साहित्य जमा झाले होते.याचे संयोजन डॉ.मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्याध्यक्ष  राजेंद्र फडतरे यांनी केले होते.सलग १८ वर्षे संस्कार प्रतिष्ठान हा उपक्रम राबवित आहे.

विजय आगम,मिलन गायकवाड,मिनाक्षी मेरुकर,अर्पिता आजगावकर,रंजना गोराणे,विद्या भागवत,मनिषा आगम,नलिनी काकडे,सानिका सकपाळ,सेजल सकपाळ सांनी सहभाग घेतला होता.प्राथमिक शाळा जुम्मापट्टीच्या मुख्याध्यापिका स्मिता म्हात्रे, गिता पाटील,माधुरी केदारी,छाया चव्हाण ,वैशाली ढोले आणि प्राथमिक शाळा पाषाणेचे मोहम्मद हुसेन नसीर पटेल ,दिलीप दुंदू गोतारणे,सुदाम शंकर लांडे ,कल्पना देवराम आंबरे उपस्थित होते. संस्कार प्रतिष्ठानचे दोन्ही शाळेच्या वतीने आभार मानले.

error: Content is protected !!