दिसतं तसं नसतं- म्हणून जग फसतं!
होय मित्रांनो, एक अंतर्मुख करणारा प्रसंग आहे.
एक आजीबाई सकाळी सकाळी तिच्या नातीसाठी स्वेटर तयार करीत होत्या!- शाळेचा अभ्यास करून परत आलेली त्या आजीची नात  आजी जवळ जाऊन बसली आणि अतिशय जिज्ञासेने- कौतुकाने आपल्या आजीकडे ती बघायला लागली की– आपली आजी हे काय करते आहे?

त्यावेळी आजी तिला म्हणाली की -बाळा तुझ्यासाठी स्वेटर विणते आहे!बघ कितीछान दिसतोय! तुला निश्चितच शोभेल आणि हा तुझा  स्वेटर बघून तुझ्या मैत्रिणी तुझा हेवा करतील याची मला खात्री वाटते! त्या स्वेटर वर आजी दोन उलटे दोन सुलटे असे टाके घालण्यात मग्न होती! आजीच विणण्याच काम बघत असतानाच नातिला त्याचं डिझाईन काही मनापासून पसंत पडत नव्हतं!

आजीचिं नात स्पष्टवक्ती असल्याने तिने आजीला ठणकावून सांगितलं की- मला असला गाठी आणि तितकाच गावठी असलेला- मला न आवडणाऱ्या डिझाईनचा स्वेटर मी कधीच घालणार नाही! आपल्या नातीची ही प्रतिक्रिया ऐकून आजी हसली आणि तिला म्हणाली की हे बघ बाळा तू हास्वेटर आतल्या बाजूने पाहिला आहेस!

आता तो सुलटा करून बघ म्हणजे तुला कळेल की तो किती सुंदरआहे! नक्षीदारआहे! आणि खरोखरच मित्रांनो तिने तो सुलटा करून पाहिल्यानंतर तिला तो सुंदर आणि नक्षीदार स्वेटर मनापासून आवडला! नातीला आपली चूक कळली आणि निशब्द होऊन आजीसमोरच तिने तो स्वेटर आपल्या अंगात घातला!

मित्रांनो- आपण विणलेल्या- नातिने घातलेल्या स्वेटरला पाहून आजीला निश्चितच आनंदाची अनुभूती आल्याशिवाय राहिली नाही!- मित्रांनो आपल्या आयुष्यात असच असत!- आपणही अनेकदा अतिशय सीमित दृष्टिकोनातून एखाद्या वस्तूकडे- प्रसंगाकडे बघत असतो! त्यामुळे सहाजिकच आपलाच गोंधळ उडतो!

पण जेव्हा हीचबाब आपण वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीने उलट-सुलट करून बघतो-त्यावेळी मात्र त्या प्रसंगाचं- त्या गोष्टीचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं आणि आपण हरखून जातो!- चला आजचा संदेश आपल्या पर्यंत पोहोचला.
( शब्दांकन -ला.डॉ.शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!