वडगाव मावळ:
मोरया ढोल ताशा ध्वज पथक वाद्य पूजन शुभारंभ मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे नगराध्यक्ष मयूर ढोरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे आणि ढोल पथकातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत विशाल लाॅन्स येथे संपन्न झाला.

यावर्षी मावळसह संपूर्ण महाराष्ट्रात ढोल पथकांचा आवाज जोशात घुमणार असून मोरया ढोल पथकाला  बारा वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर  मोरया ढोल पथकातील  सुमारे १५० सभासदांच्या उपस्थितीत सरावास प्रारंभ करण्यात आला आहे. परराज्यात जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने वादन करणारे मोरया ढोल पथक हे मावळ तालुक्यातील पहिले पथक आहे.

सामाजिक बांधिलकीतून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोरया ढोल पथकाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील अशा विश्वास नगराध्यक्ष मयूर ढोरे, पथक प्रमुख गणेश जाधव यांनी दिला.

error: Content is protected !!