
इंदोरी:
येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षीप्रमाणे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला सर्वप्रथम होम हवन करून शाळेतील परिसर मंगलमय करण्यात आला. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व असते .
विद्यार्थ्यांच्या मनात गुरूंविषयी प्रेम, आदर, श्रद्धा, भाव इत्यादी भावनांची जोपासना करण्यासाठी चैतन्य इंटरनॅशनल स्कूल नेहमी प्रयत्न करते. या उद्देशाने शाळेमध्ये मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला .प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले गुरू हे आई वडील असतात .
शिक्षक हे प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञानाचा प्रकाश देतात म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आई वडील व शिक्षक यांची पाद्यपूजा केली, त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांच्या हस्ते शुद्ध आणि सात्विक वातावरणात बनवलेल्या प्रसादाचे वाटप करण्यात आले .यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान शेवकर, प्राचार्या जेसी रॉय, शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
- धर्मासाठी मृत्यूला कवटाळून संभाजीमहाराज अमर झाले: डॉ. केदार फाळके
- जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो!’ – प्रा. डाॅ. वर्षा तोडमल
- बीना इंग्लिश स्कूलच्या वतीने काश्मीरमधील मृतांना श्रद्धांजली
- नफ्यातून समाजोपयोगी उपक्रम घेणाऱ्या काळोखे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : सर्जेराव कांदळकर
- गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुकन्या रितेश चोरघे बिनविरोधडीजे,डॉल्बी आणि ढोलताशांच्या दणदणाटाला फाटा : किर्तन सोहळ्याचे आयोजन



