वडगाव मावळ:
ते शाळेत आले..तेव्हा तेही…नवखेच होते. चार भिंतींच्या आत त्यांचे मन रमले..अन बघता बघता चौदा वर्ष झाली…आज त्यांची बदली झाली..चौदा वर्षाच्या सेवे नंतर त्यांना दुस-या शाळेत जायचं होत.आपल्या गुरुजींची बदली झाली… तशी चार वर्षापूर्वी याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून रूजू झालेल्या बाईची ही बदली झाली आहे. गुरूजी आणि बाई यांची बदली झाल्याची कुणकुण गावाला लागली होतीच.
गुरूजी आणि बाई यांना निरोप द्यायला आख्ख गाव शाळेच्या प्रांगणात लोटले. गुरूजी आणि बाईंचे पाद पुजन केले.ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढली. ठिकठिकाणी औक्षण झाले. या आनंदाच्या सोहळ्यात आपुलकीची,माणुसकीची भावना होती. आमच्या लेकरांना लिहायला वाचायला शिकवले यांची कृतज्ञता होती. आजच्या गुरू पौर्णिमेला हा सोहळा आंदर मावळातील कुसवली गावात संपन्न होत होता.
एकीकडे आनंदाची भरती आली असताना,दुसरीकडे इतकी प्रेमळ माणसं सोडून जाताना शिक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पालक,विद्यार्थी भावुक झाले होते.त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. चौदा वर्षाच्या अनेक आठवणी डोळ्या समोरून तरळून जात होत्या. आजच्या गुरुपौर्णिमेच्या केंद्रस्थानी होते,चौदा वर्षे कुसवली च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र काम केलेले रामेश्वर पवार गुरूजी आणि चार वर्षं मुख्याध्यापिका म्हणून काम केलेल्या सुनिता मोरे बाई.
पवार गुरूजी यांची नवलाखउंब्रेतील चावसर वस्ती येथे बदली झाली. मोरे बाईंची आंदर मावळातील कोडिवडे येथे बदली झाली. या दोन्हीही शिक्षकांच्या बदली नंतर संपूर्ण गाव रस्त्यावर उतरावे,ढोल लेझीम च्या गजरात त्यांना निरोप द्यावा. डोळ्यातून अश्रू व्हावेत ,असे सहज होत नाही,त्यासाठी त्या शिक्षकांनी शाळेसाठी,गावसाठी दिलेले योगदान लाख मोलाचे आहे. यातूनच असे आनंदाचे प्रसंग शिक्षकांच्या आयुष्यात येत असतात.
रामेश्वर पवार गुरुजी आणि मोरे बाईनी डिजिटल शाळा ज्ञानरचनावादी वर्ग,
नाविन्यपूर्ण अध्यापन साहित्य , त्याची निर्मिती करून त्याचा अध्यापनात वापर,अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तास,पाढे पाठांतर उपक्रम ,हस्ताक्षर सुधार उपक्रम ,शालेय रंगरंगोटी
,बोलक्या भिंती,परसबाग निर्मिती ,विविध सामाजिक उपक्रम
सांस्कृतिक कार्यक्रम असे एक ना अनेक उपक्रम राबविले त्यातून या शाळेतील विद्यार्थी घडले.
असेच अनेक सुखद अनुभव मावळातील प्रत्येक शिक्षक शिक्षिका यांच्या आयुष्यातील येतील असा विश्वास बळगायला काही हरकत नाही.
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!