निगडे:
निगडे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावक-यांनी केली आहे.
विलास पुंडले यांनी दिलेल्या माहितीनुसार,” शनिवार ता.१ ला पहाटे तीनच्या सुमारास निगडे येथील धारेची ठाकरवाडी येथे बिबट्या दिसला. पहाटे पहाटे कुठलेही जनावर हातात न आल्याने बिबट्याने आंब्याच्या झाडावर बसलेल्या कोंबड्याची शिकार करून पळाला.
धारेचीवाडी येथील गणपत बाबू ठाकर यांच्या मालकीचा हा कोंबडा रोजच आंब्याच्या झाडावर बसत असे, पहाटेचे शांत वातावरण पाहून बिबट्याने ह्या झाडावर बसलेल्या कोंबडावर आपला हल्ला चढविला, याच वेळी धारच्या ठाकरवाडीतील कुत्री बिबट्याच्या हल्याने घाबरून लपून बसली होती. जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे बिबट्याने आता कुत्री आणि कोंबड्यांवर हल्ला चाढवायला सुरूवात केली आहे.
निगडे, पवळेवाडी कल्हाट परिसरात सांबर जातीच्या हरणांची संख्या भरपूर वाढलेली आहे, परंतु सांबर जातीचे हरीण बिबट्याला पकडता येत नाही. या हरणाची शक्ती आणि पळण्याची क्षमता फार जास्त असल्यामुळे बिबट्याच्या हाती हे हरिण लागत नाही.
निगडे परिसरात सध्या लांडग्याचा वावर देखील वाढला असल्याची माहिती स्थानिक देत आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एक वर्षापासून हे लांडगे निगडे परिसरातील धारेची ठाकरवाडी, पद्दमावती पायाथा, कुरणाची ठाकरवाडी व शिरे शेटेवाडीच्या माळरानात फिराताना आढळून आलेले आहेत.
निगडे येथील शेतकऱ्यांची परिस्थिती ‘ना घर का ना घाटका!’ अशी झालेली आहे. निगडे परिसरातील जमिनी प्रास्तावित एम् आय डी सी प्रकल्पासाठी घोषित झालेल्या आहेत. त्यातच निगडे पवळेवाडी व कल्हाट हा परिसर दुर्मिळ अशा जंगल संपत्तीने नटलेला आहे. या परिसरात अनेक दुर्मिळ झाडे वेली प्राणी पक्षांची नोंद आहे. त्यामुळे हा भाग जंगल खात्याने विशेष हरीत पट्टा म्हणून जाहिर केलेला आहे.
याचा परिणाम म्हणून निगडे परिसरातील शेतकरी अडचणीत आलेला आहे येथील शेतकऱ्यांनी सर्व प्रकारची शेती करणे सोडून दिले आहे. खरीप व रब्बी हंगामात येथे शेतकऱ्यांना जंगली श्वापदांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथी शेती व्यवसाय संपूर्णपणे कोलामडला आहे. त्याताच मध्ये मध्ये असे बिबट्यांचे हल्ले सतत शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. त्यामुळे निगडे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडला असल्याची खंत विलास पुंडले यांनी व्यक्त केली.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन