तळेगाव स्टेशन:
थोर समाजसुधारक तत्वज्ञ सद्गुरू श्री.वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त जीवनविद्या मिशन तर्फे कृतजता दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. ०२ जुलै २०२३ रोजी कृतज्ञता दिन आयोजित केला आहे. तरी सर्व नामधारकांनी व ग्रामस्थांनी कार्यक्रमाची शोभा वाढवावी , असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
सकाळी १० ते ११ वा. : हरिपाठ, संगित जीवनविद्या,सकाळी ११ ते ११:३० वा. : गुरुपुजन,सकाळी ११:३० ते १२ वा. : विद्यार्थी गुणगौरव,दुपारी १२ ते १:०० वा. : प्रबोधन दुपारी १:०० ते १:३० वा. : महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
सद्गुरू श्री वामनराव पै यांचे शिष्य प्रबोधनकार चंद्रकांत निंबाळकर यांचे प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची या विषयावर व्याख्यान होणार आहे. रिक्रिएशन हॉल, जनरल हॉस्पिटल, तळेगांव दाभाडे येथे हा समारंभ संपन्न होईल.
जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र- तळेगांव दाभाडे कार्यक्रमाचे आयोजक आहेत.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान