वडगाव मावळ :
महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशन संघटनेची  विशेष सभा  रविवारी  (दि.२ जुलै)ला  तळेगाव दाभाडे येथे होणार असल्याची माहिती राज्य संघटक सोनबा गोपाळे यांनी दिली.

     महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात  सुमारे  १० लाख  शेतकरी  पोल्ट्री  व्यवसाय  करीत  असुन  या व्यवसायील सर्वच शेतकरी असंघटित असल्याने  त्याची मोठ्या प्रमाणावर  पिळवणूक  होत असते. यासाठी गेल्यावर्षी  रायगड जिल्ह्याचे अनिल खामकर यांचेमार्गदर्शनाखाली  संघटनेची  स्थापना करण्यात आलेली आहे.
    
या नव्याने स्थापन करण्यात  आलेल्या  संघटनेची  राज्यव्यापी  सभा तळेगाव दाभाडे  येथील  अँड. पु .वा.परांजपे  विद्या  मंदिर  सभागृहात आयोजित केलेली आहे.
मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे, कार्याध्यक्ष सुभाष केदारी  ,सचिव प्रविण शिंदे, सहसचिव महेश  खजिनदार विनायक बधाले , संभाजी केदारी,  सोमनाथ राक्षे , बाबाजी पाठारे यानी या सभेचे आयोजन केले आहे.

  मावळ तालुक्यातील  सर्व पोल्ट्री फार्मरनी या विशेष सभेस उपस्थित  रहावे असे आवाहन  गोपाळे यांनी केले.

error: Content is protected !!