मनाचे महत्व (अंतर्मन)
अंतर्मनाचे कार्य आपल्या जीवनात अतिशय गुप्त रीतीने चालत असते.विचित्र विक्षिप्त आणि विलक्षण असे हे अंतर्मन असून ‘कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्’ अशी प्रचंड शक्ती या अंतर्मनात वास करते.संस्कृती आणि विकृती या दोन्हीचेही केंद्र अंतर्मन आहे.

प्रकृती हा माणसाचा स्वभाव आहे,या प्रकृतीकडून संस्कृतीकडे वळायचे की विकृतीकडे झुकायचे हे अंतर्मनाची झालेली जडणघडण म्हणजेच (Pattern) यावर अवलंबून असते. आता या दोन मनांचा एकमेकांशी संबंध कसा आहे तो आपण पाहू.

विचार या क्षेत्रात अनेक गोष्टीचा समावेश होतो,कल्पना,भावना, धारणा,वासना,संकल्प,विकल्प काळजी,चिंता,प्रीती,भीती वगैरे अनेक गोष्टी ‘विचार’ या रूपात नांदत असतात.वरील सर्व प्रकारच्या गोष्टी आपले अंतर्जगत (The world within) असून ते आपल्या बाह्य दृष्य जगताला साकार करीत असते.

या संदर्भात डॉ.मर्फी या अमेरिकन फिलॉसॉफरचे उद्गार उल्लेखनीय आहेत-*
  *”Your sub-conscious mind is very sensitive to your thoughts which form a mould or matrix through which infinite intelligence wisdom vital forces and energies of your sub-conscious power flow”.*

*तुम्ही जे शुभ किंवा अशुभ विचार बहिर्मनात सतत घोळवत रहाल,त्याप्रमाणे तुम्हाला जीवनात चांगली किंवा वाईट परिस्थिती अनुभवाला येईल.थोडक्यात,तुमचे बहिर्मन,अंतर्मनाची जडण-घडण करते व हेच अंतर्मन तुमच्या जीवनाचे शिल्प,त्याप्रमाणे घडविते असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे.ह्या संदर्भात एक उत्कृष्ट दाखला देता येईल.माणूस आणि हत्ती ह्या दोघांच्या शक्तीचा विचार केला तर आपल्याला असे दिसेल की,माणसाची शक्ती,अत्यंत अल्प असून हत्तीची शक्ती प्रचंड आहे.
*
हत्तीने आपला एक पाय जर माणसाच्या डोक्यावर ठेवला तर माणूस तात्काळ भुईसपाट होईल. पण माणसाकडे जर युक्ती असेल तर तोच माणूस हत्तीकडून अनेक कामे करून घेईल.त्याचप्रमाणे अंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे. बहिर्मनाने युक्तीने म्हणजेच शहाणपणाने अंतर्मनाशी संबंध जोडला तर ते अंतर्मन तुम्हाला साथ टेईल व तुमच्या जीवनात सुख, शांती निर्माण करील.

त्याच्या उलट निर्बुद्धपणे बहिर्मनाने अंतर्मनाशी संबंध जोडला तर तेच अंतर्मन तुमच्या जीवनात साथ देण्याऐवजी साडेसाती निर्माण करील.परिणामी तुम्हाला दुःख,क्लेश वगैरे नको त्या गोष्टी प्राप्त होतील.*

थोडक्यात-As per the law of your mind you get a reaction or response from your sub-conscious mind, according to the nature of thoughts that you habitually entertain in your conscious mind.

सद्गुरू श्री वामनराव पै.

error: Content is protected !!