कामशेत:
येथे आढळलेल्या आठ फूटी अजगराला अधिवासात सोडून देण्यात आले.वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या टीमने हे काम फत्ते केले.
वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य सोन्या वाडेकर, तेजस शिंदे, कार्तिक गायकवाड यांनी ८ फुटी अजगर कामशेत इथे रेस्क्यु केला. कामशेत भागात अजगर साप नेहमी खूप ठिकाणी आढळून येतो. सापला रेस्क्यू केल्या नंतर त्याची माहिती संस्था चे संस्थापक निलेश गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे यांना दिली.
प्रमोद ओव्हाळ, दक्ष काटकर ,यश बच्चे, शुंभम आंद्रे,ओमकार कडू. जिगर सोलंकी यांनी सापाची प्राथमिक तपासणी करून वडगांव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या निर्देशना खाली त्याला त्याच्या अधिवासात परत सुख रूप सोडून दिले.
पावसाळ्यात साप बाहेर पडतात, नागरिकांनी घर, शेत व इतरत्र वावरताना खबरदारी घ्यावी असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच
कोणत्या ही सापाला न मारता त्याला स्वतःहून जाऊद्या किंवा जवळ पास चे प्राणीमित्र किंवा वनविभागाला कळवा असे आवाहन ही केले.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित