पंढरपूर:
शासकीय पुजेच्या निमित्तानं महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री श्री.विठ्ठलाला काय साकडं घालतात, याकडं संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा होईल.

आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविक पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. दर्शनरांगेतील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी २ वाजता सोलापूरसाठी सह्याद्री अतिथीगृहावरून निघतील. त्यानंतर दुपारी ४.३०  वाजता ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या जनजागृती उपक्रमाच्या समारोप सोहळ्याला उपस्थितीत राहतील.

पाच वाजता सोलापूर वन विभागानं तयार केलेल्या काॅफिटल बुकचं अनावरण आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पंढरपूरकडं प्रस्थान करतील. ५.१५  वाजता आषाढी यात्रा स्वच्छता दिंडीचा समारोप सोहळा होणार आहे,या सोहळ्यास शिंदे उपस्थित राहतील.

२९  जून रोजी मध्यरात्री २.३० वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा होणार आहे. ती पहाटे ४ पर्यंत चालणार आहे. या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री सहकुटुंब हजर राहतील, असं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचा असा दोन दिवसीय सोलापूर दौरा असणार आहे. या शासकीय पुजेच्या निमित्तानं मुख्यमंत्री विठ्ठलाला काय साकडं घालतात, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

error: Content is protected !!