कामशेत:
कुसगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मनिषा योगेश लालगुडे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते सरपंच अनिल येवले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात मंडलाधिकारी सचिन कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.

सरपंच पदासाठी मनिषा योगेश लालगुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कोकाटे यांनी लालगुडे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. लालगुडे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच,समर्थकांनी फटाक्यांची अतिषबाजी  व भंडारा गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. वाद्यांच्या गजरात ग्रामदैवतांच्या मंदिरात जावून लालगुडे यांनी दर्शन घेतले.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच दिपाली लालगुडे,सदस्य  सुधिर लालगुडे, अनिल येवले उपस्थित होते.गावकामगार तलाठी राम बाचेवाड ,  ग्रामसेविका   नूतन अमोलिका यांनी निवडणूक सहाय्यक म्हणून काम पाहिले.

सरपंच मणिषा लालगुडे म्हणाल्या,” गाव पातळीवरील विकास करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. गावातील मुलभूत सुविधांवर अधिक भर देणार असून आरोग्य,शिक्षण,पिण्याचे पाणी,अंतर्गत रस्ते या कामांना विशेष प्राधान्य देणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

error: Content is protected !!