कोल्हापूर सारख्या दंगली घडू नयेत म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा शाहूवाद आपण जोपासावा: शिवाजीराजे जाधव
पुणे:
पुढील काळात कोल्हापूर सारख्या दंगली घडू नयेत म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा शाहूवाद आपण जोपासला पाहिजे असे मत राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव यांचे सोळावे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी व्यक्त केले

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या राजर्षी शाहू जन्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणाचे कार्य खऱ्या अर्थाने शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून पुढे घेऊन जाणाऱ्या राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनचे कार्याचे त्यांनी कौतुक केले.

राजर्षी शाहू जन्मोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या जन्मोत्सवासाठी राष्ट्रमाता जिजाऊंचे वडिल लखुजीराजे जाधव यांचे १६ वे वंशज  शिवाजी राजे जाधव, राजेंद्र दुबल, चंद्रकांत मोकाटे, मिलिंद पवार, लता राजगुरू, बाळासाहेब बोडके, यशवंत भुजबळ, डॉ.प्रणाली चौधरी, मोनिका सांडभोर, स्मिता वडघुले उपस्थित होत्या.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना राजर्षी शाहू सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यातून विद्यार्थ्यांना मदत आणि प्रोत्साहन देण्याचे काम फाउंडेशन करते. राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार टाइम्स मिररच्या ब्युरो चीफ अर्चना मोरे, गाथा प्रेमी युवा कीर्तनकार ह.भ.प.श्री.दत्ता महाराज दोन्हे पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे संस्थापक सुजित लक्ष्मण यादव. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव जाधव, दुर्ग संवर्धन व शिव-फुले-शाहू विचारांचे सामाजिक कार्यकर्ते विजय वरखडे. गडकिल्ले संवर्धनासाठी किल्ले लळींग संवर्धन समिती, धुळे. शिवजयंतीच्या माध्यमातून प्रबोधनासाठी शिवप्रेमी सेवा संघ, ऍम्युनिशन फॅक्टरी खडकी, संविधान जनजागृतीसाठी लोकायत संस्था,परिवर्तन दूत पुरस्कार यामध्ये पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद शिंदे, डॉ.प्रशांत पाटील,डॉ.नामदेव जवरे, डॉ. सचिन महाजन, डॉ.योगेशसिंह राजपूत यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक कैलास वडघुले यांनी केले, सूत्र संचलन डॉ.स्वप्निल चौधरी व विराज तावरे यांनी केले तर ॲड. मिलिंद पवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत धुमाळ अनिल माने, शुभम काळे,मंदार बहिरट अक्षय रणपिसे  निलेश इंगवले रोहित ढमाले  युवराज ढवळे, सचिन जोशी  आकाश मोरे, सचिन भामरे, बाळासाहेब सोनाळे, मुकेश यादव, मयूर शिरोळे, रोहित सांडभोर, सौ स्मिता वडघुले, सौ.सोनाली धुमाळ, सौ स्मिता बहिरट, सौ मेघा कदम, सौ मोनिका सांडभोर, सौ स्नेहल पायगुडे, हनुमंत पवार, राजेश कदम, ऋषिकेश बाळा पवार, अतुल ढगे, रोहित तेलंग, अमित देशमुख, अजिंक्य काळे, अतिश जगदाळे, निखिल भस्मारे प्रदीप पवार, रोहित पंडित, शुभम तारू ,ललित जगदाळे यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!