
वडगाव मावळ:
आमच्या मांडीला मांडी लावून राजकारण केलेली मंडळी आम्हाला जातीयवादी संबोधतात तरी कसे असा प्रश्न केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला. मावळ लोकसभा मतदार संघात केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या झालेल्या लाभार्थी संमेलनात दानवे बोलत होते.
देशभरातील धर्मनिरपेक्ष विचार मांडणारी अनेक मंडळी कधी काळी आमच्या मांडीला मांडी लावून सत्तेवर होती. आम्हाला सोबत घेतल्या शिवाय त्यांचे राजकारण पुढे सरकले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधून ‘आमचा अजेंडा सर्वसामान्य जनतेचे भले करणे हाच आहे हे अधोरेखित केले. भाजपाला जातीयवादी म्हणा-या अनेक नेत्यांची उदाहरणे दानवे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळात ‘गरीब कल्याण’ हेच प्रमुख ध्येय ठेवलं होतं. त्यामुळे या कल्याणकारी योजनांचे लाभार्थी मोठ्या प्रमाणावर आहेत. मावळ मतदार संघातील अशाच काही लाभार्थ्यांना सामूहिकपणे सरकारच्या कामगिरीची माहिती देत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी संवाद साधला.
याप्रसंगी खासदार अमर साबळे ,मावळ लोकसभा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप,आमदार उमा खापरे, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्य्क्ष रवींद्र भेगडे,जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे,प्रदेश भाजपा सदस्य जितेंद्र बोत्रे,लाभार्थी संमेलनाचे संयोजक किरण भाऊ राक्षे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम,देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार,महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,अलका धानिवले,तळेगाव शहराचे अध्यक्ष रविंद्र माने,वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे,देहूरोड शहर अध्यक्ष बाळासाहेब शेलार,देहुगाव शहर अध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल,बाबुलाल गराडे,गणेश ठाकर,प्रवीण शिंदे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ



