वडगाव मावळ:
साते ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गणेश बोऱ्हाडे यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या सरपंच आरती सागर आगळमे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.

सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी  ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच पदासाठी गणेश बोऱ्हाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बो-हाडे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

बो-हाडे यांची निवड घोषित होताच,समर्थकांनी भंडारा गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. बो-हाडे यांनी ग्रामदैवत च्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

यावेळी सरपंच आरती आगळमे, उपसरपंच आम्रपाली मोरे, सखाराम काळोखे, ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथ आगळमे, संदीप शिंदे , माजी सरपंच संतोष शिंदे, वर्षा नवघणे, ज्योती आगळमे, श्रुती मोहिते, उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे  दुग्ध व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, माजी सरपंच भाऊसाहेब आगळमे, समर्थ पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर नवघणे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, यशवंत पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुदाम  आगळमे, माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश आगळमे, उपसरपंच गोरख बांगर, वडगाव शहर  राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अतुल वायकर, भाऊसाहेब ढोरे , माजी सरपंच विठ्ठल मोहिते, अनिल मोहिते , अर्जुन आगळमे, मारुती जबाजी आगळमे , बंडू आगळमे, दशरथ आगळमे, हिरामण बोऱ्हाडे, संजय आगळमे, सुनील शिंदे ,संजय शिंदे, गजानन शिंदे , अनिल गायकवाड, संदीप शिंदे , विलास आगळमे,विजय उभे,  नथू गावडे, दत्तात्रय पांडे, मारुती दसगुडे, नामदेव गाभणे , देवराम पारीठे, संजय सुर्वे, जालिंदर कोल्हे यांनी नवनिर्वाचित सरपंच गणेश बो-हाडे यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!