टाकवे बुद्रुक:
आत्मा अंतर्गत महिला शेतकऱ्यांचा मधुमक्षिका पालनासाठी राज्यांतर्गत अभ्यास दौरा झाला कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री अशोक सिंगल मेमोरियल ट्रस्ट,मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील वडेश्वर,कुसवली,मोरमारेवाडी येथील ३० महिला शेतकऱ्यांचा अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
पुणे जिल्ह्याचे आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ व तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ यांचे मार्गदर्शनाखाली आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे,कृषि सहाय्यक घनश्याम दरेकर तसेच श्री अशोक सिंघल मेमोरियल ट्रस्टचे प्रकल्प व्यस्थापक माणिक गवळी यांनी नियोजन केले होते.
या अभ्यास दौऱ्यात देशातील पहिले मधाचे गाव म्हणून नावलौकिक मिळविलेले महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गाव,महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मध संचालनालय,महाबळेश्वर ,जिल्हा रेशीम कार्यालय,वाई तसेच मॅप्रो गार्डन,वाई या ठिकाणी भेटी देण्यात आल्या.
सर्वप्रथम महाबळेश्वर तालुक्यातील देशातील पहिले मधाचे गाव मांघर येथे भेट देऊन मधूसागर मध उत्पादक सोसायटीचे अध्यक्ष शमहादेव जाधव यांनी मांघर गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मधाचे संकलन करून त्याची प्रक्रिया करून स्वतःचा मधूसागर ब्रॅण्ड तयार करून त्याची विक्री व्यवस्था कशी निर्माण केली तसेच देशातील पहिले मधाचे गाव म्हणून नावलौकिक मिळविला इथपर्यंतचा सर्व प्रवास सांगून मधुमक्षिका पालन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर प्रत्यक्ष जंगलामध्ये मधपेटी कशी बसविली जाते तसेच मध कसा काढला जातो,मधपेटीची काळजी कशी घेतली जाते यांविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.यानंतर मध संचालनालय, महाबळेश्वर येथे भेट देऊन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या विविध योजना,मध प्रक्रिया तसेच मधूबन म्युझियम इ.विषयी माहिती घेतली.
यानंतर वाई येथे जिल्हा रेशीम अधिकारी यांचे कार्यालयास भेट देऊन रेशीम उद्योगाबद्दल रेशीम लागवड ते रेशीम उत्पादनापर्यत सविस्तर माहिती घेऊन माहिती घेतली. परतीच्या प्रवासात वाई येथील मॅप्रो गार्डनला भेट देऊन स्ट्राबेरी प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती घेतली.
या अभ्यास दौऱ्यात महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तसेच त्यांनी प्रत्येकीने एक मध पेटी खरेदी करून मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरु करण्याची ग्वाही देऊन कृषि विभाग,आत्मा तसेच श्री अशोक सिंघल मेमोरियल ट्रस्टचे आभार मानले.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन