वडगाव मावळ –
मावळ तालुक्यातील नागरिक सुविधा केंद्राच्या सर्व्हर डाऊनचा तांत्रिक बिघाड लवकर दुरुस्त करा अशी मागणी संस्कार चव्हाण यांनी केली. चव्हाण यांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
मावळ तालुक्यातील वडगाव येथील असणाऱ्या नागरिक सुविधा केंद्रातील “सर्व्हर डाऊन” च्या असुविधेमुळे अनेक मावळ तालुक्यातील नागरिकांचे महत्वपूर्ण दाखल्यांची कामे रखडलेली आहे. या मध्ये विशेषतः ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी वर्गाची आर्थिक दुर्बल घटक, वय व अधिवास,उत्पन्न, जात प्रमाणपत्र,नॉन क्रिमीलेयेर, या सारखे विविध प्रकारचे दाखले सर्व्हर डाऊन या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडले आहे.
आता जुन महिना चालू आहे,या महिन्या मध्ये केवळ मावळ नव्हे तर संपूर्ण राज्यात कॉलेज प्रवेशाची गडबड चालू असते, प्रामुख्याने वकिली,फार्मसी, एमपीएससी या सारख्या अनेक प्रवेश परीक्षेसाठी वरील नमूद दाखले गरजेचे असतात,व ते जर निर्धारित वेळेत मिळाले नाही तर संबंधित विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक नुकासानाला सामोरे जावे लागते.अनेक मावळ तालुक्यातील विद्यार्थी वर्गाला खूप लांबचा प्रवास करावा लागतो.
तरी या विषयात त्वरित लक्ष घालून संबंधित अधिकारी यांना हा तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी सूचना द्याव्या,जेणे करून मावळ तालुक्यातील गोर-गरीब विद्यार्थी वर्गाचे शैक्षणीक नुकसान होणार नाही असे निवेदन पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरियर्स चे मा.अध्यक्ष संस्कार तानाजीराव चव्हाण यांनी दिले. प्रसंगी विकास घारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या बाबत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या असून हा तांत्रिक बिघाड सुधारित करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन