टाकवे बुद्रुक:
वडेश्वर ग्रुप ग्रामपंचायत व श्री.अशोक सिंघल मेमोरिअल ट्रस्ट,मुबई  या सामाजिक संस्थेकडून अतिशय दुर्गम अशा सटवाईवाडी व डोंगरवाडी या गावांना टॅकर दवारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

सटवाईवाडीत महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जीवनमुक्त धरून महिला पाणी आणीत आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी तासंतास झ-याच्या कडेला बसून टिपनळीचे पाणी भरावे लागत आहे. सटवाईवाडीची ही भीषण परिस्थिती.’मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन’ने मांडली होती त्याची दखल घेत सटवाईवाडीला आज श्री.अशोक सिघल मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरची सोय करण्यात आली.

तर उद्या ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याच्या टॅकरची  सोय करण्यात येणार असल्याची सरपंच हेमाडे यांनी दिली.
ज्या संस्थेने मदत केली त्या संस्थेविषयी माहिती जाणून घेऊया.
               श्री. अशोक सिंघल मेमोरिअल ट्रस्ट,मुबई  संचलित ग्रामदूत प्रकल्प, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवन मावळ व आंध्र मावळ या ग्रामीण भागातील ३१ गावामध्ये (वाड्या व वस्त्या मिळून ६८)   जानेवारी २०२१ पासून राबविला जात असून,सदर प्रकल्पाअंतर्गत
                “आरोग्य,शिक्षण,पाणी,कृषी व नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित उद्योगनिर्माण” व महिलांचे आर्थिक व  अशा विविध विषयात कार्यरत आहे.नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था असून आरोग्य,शिक्षण,स्वावलंबन सामाजिक संघटन,ग्रामविकास,जलसंधारण,कृषी अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहे.
               
मावळ तालुक्याती पवन मावळ व आंदर मावळ या भागात संस्था जानेवारी पासून कार्यरत असून,सदर भागात  जवळ जवळ ८० भाग आदिवासी समाज वास्तव्य करत आहे,अनुसूचित जाती व जमातीच्या  गावांचा सर्वागीण विकास व्हावा व आर्थिक उन्नती व्हावी ,आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्यात ,गावाचे संघटन व्हावे,शेतीचे उत्पन्न वाढावे व त्यावर आधारित उद्यौग निर्माण व्हावे ,शिक्षणाचा दर्जा उंचवावा व त्याचे सार्वत्रीकरण व्हावे   ,त्यांचा सांस्कृतिक ठेवा जोपासला जावा,गावात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हावे, गावागावात उद्यौजक निर्माण व्हावेत. असताना लोकसहभागातून ग्राम विकासाची सर्व कामे केली जावीत, हि संकल्पना घेऊन संस्था कार्यरत आहे,

सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात जरी भरपूर पाउस पडत असेल तरी यावर्षी वरूण  राजाने ओढ दिली असल्याने मावळातील अनेक डोंगरभागातील व डोंगरावरील गावांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली असून त्यांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ फिराव लागत आहे ,याची दाखल घेऊन संस्थेच्या वतीने वडेश्वर /माऊ ग्रामपंचायत मधील अतिशय दुर्गम अशा सटवाईवाडी व डोंगरवाडी या दोन्हीं गावांना tankar द्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे

,सदर उपक्रम सुरळीत व्हावा म्हणून श्री राजू ठीकडे यांची समन्वयक म्हणून कामकाज पाहत  आहे. तसेच अशा परिस्थितीत संस्था त्यांना पिण्याचे पाणी कमी पडू दिले जाणार नाही असे आश्वासन संस्थेचे प्रकल्प प्रमुख श्री माणिक गवळी यांनी वडेश्वर/माऊ ग्रामपंचायत  व ग्रामस्थांना दिले.

error: Content is protected !!