
टाकवे बुद्रुक:
मावळ.तालुक्यांतील सटवाईवाडीत महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिनी तासन्तास विहीरीच्या काठावर बसून आहेत.पावसाने ओढ दिल्याने विहीरीच्या पाण्याने तळ गाठला आहे.
सटवाईवाडी सह्याद्रीच्या पठारावर वसलेले गाव आहे,देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष झाले तरीही आजुन सटवाईवाडी गावात पाण्याची सोय उपलब्ध नाही.गावात पाण्याच्या दोन विहिरी आहेत.
पण एप्रिल आणि मे महिन्यात या विहरीतील पाणी कमी होऊन ते पाणी पिण्यास योग्य राहत नाही. पाण्याचा दुसरा पर्याय नसल्यामुळे गावकऱ्यांना हेच पाणी प्यावे लागते.त्यामुळे अनेकांना वेगवेगळे आजार होतात. गावातील माता भगिनींना विहिरीतून पाणी काढण्यासाठी खूप कष्ट ही घ्यावे लागते. गावातील जनावरांना पिण्यासाठी पाणी भेटत नाही.
गावात इतर कोणत्याही सोय सुविधा नाहीत.सन २०२२या वर्षी गावात हर घर जल या योजनेतून गावात पाण्याची टाकी आणि पाईप लाईन टाकण्यात आली आहे. तरीही आज 1वर्ष झाले पाणी काय आल नाही.आम्हा गावकऱ्यांची विनंती आहे;की आमच्याकडे लक्ष द्यावे;गावच्या पाण्याची सोय आपण करावी; हि नम्र विनंती,सटवाईवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ



