वडगाव मावळ:
विहीरीत पडलेल्या सांबराला वाचविण्यात वन्यजीव रक्षक संस्थेला यश मिळाले,त्याचे झाले असे की नवलाखऊब्रे
गावाजवळ डोंगराच्या कडेला ठाकर वस्ती जवळ एका विहीरीत सांबर पडले होते.
हे सांबर विहीरीत.पडल्याची माहीती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विकी दौंडकर यांना गावातून समजली तसेच वन विभागा कडून ही माहिती वन्यजीव संस्थेच्या टीमला मिळाली.वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक यांना तसे फोन आले, २०/०६/२०२३ रोजी रात्रीचे एका विहिरीत सांबर पडलेले आहे.
त्यांनी लगेच संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांना फोन करुन सगळा प्रकार सांगुन रेस्कु टिम लगेच विहीरीच्या दिशेने मिळालेल्या लोकेशन वर पोचले अशी व्यवस्था केली. विहीरीत पडलेले सांबर पाण्यातुन बाहेर काढले व प्राथमिक तपासनी करुन जंगलाच्या दिशेने सोडुन दिले, तशी माहीती उपवन संरक्षक अशितोष शेंडगे ,रेंज फॅारेस्ट अॅाफिसर हनुमंत जाधव,वनरक्षक मंगल दाते ढोरे यांनी दिली. यांच्या मार्ग दर्शना खाली त्यास त्याच्या आदिवासात सोडुन दिले.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे ,अध्यक्ष अनिल आंद्रे ,विकी दौंडकर ,अविनाश कारले,रमेश कुंभार,सत्यम सावंत,विनय सावंत,जिगर सोलंकी ,सुरज शिंदे ,शुभम काकडे,गणेश निसाळ ,गणेश ढोरे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. कुठेही वन्य प्राणी निघाले किंवा जखमी असल्यास वन विभाग १९२६ किंवा वन्यजीव रक्षक मावळ च्या सदस्य यांना फोन करुन माहीती द्यावी.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन