लोणावळा:
लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेमध्ये “ ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिवसाची सुरुवात शंख नाद व शांती पाठाने करण्यात आली.
तदनंतर कैवल्यधाम संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी तसेच प्रमुख पाहुणे श्री सुनिल फुलारी, पोलीस महानिदेशक ( Special IG Kolhapur Range ) आणि डॉ. किरण कुलकर्णी (IAS) आयुक्त आणि संचालक महापालिका प्रशासन . (Commissioner & Director of Municipal Administration ) यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी लोणावळ्यातील डॉ. अंजना शहा, यश शहा आणि टीम निर्मित कैवल्यधाम योग संस्थेच्या ” योग से सहयोग Theme Song चे प्रसारण करण्यात आले. सुबोध तिवारी यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे यांनी आपली मनोगते व्यक्त करून कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या.
Common Yoga Protocol 2023 प्रमाणे सकाळी ८ ते ९ या वेळेत संस्थेच्या कुडीलाल सभागृह १ व २ मध्ये तसेच कैवल्य विद्या निकेतन शाळेत योगाचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गात लोणावळा उप विभागाचे सहायक पोलीस आयुक्त IPS सत्यसाई कार्तिक, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ आणि वडगाव मावळ पोलीस निरीक्षक विजय भोसले यांच्या सह लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर आणि ग्रामीण तसेच वडगाव पोलीस दल, लोणावळा पत्रकार संघ, टाटा पॉवर, Citizen Fouram, Pinkathon Group लोणावळा, शिवदुर्ग मित्र मंडळ इत्यादी क्षेत्रातील मान्यवर तसेच कैवल्याधाम संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, योग महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेले देश विदेशातील विद्यार्थी आणि कैवल्य विद्या निकेतन
शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) कार्ला, डॉ. बी. एन. पुरंदरे महाविद्यालय, वलवण, लोणावळा, L & T Traning Centre, The Great Eastern College, हॉटेल फर्याज तसेच एकविरा मंदिर, वेहेरेगाव मावळ परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कैवल्यधाम संस्थेतर्फे योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वीरीत्या साजरा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
(Maharashtra Tourism) यांचे विशेष सहकार्य लाभले. ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री देवल चौहान यांनी केले आणि आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव सुबोध तिवारी यांनी केले.
लोणावळा येथे १९२४ साली स्वामी कुवलयानंद जी यांनी कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली होती. कैवल्यधाम योग संस्था २०२३ २४ मध्ये आपले शताब्दी वर्ष साजरे करीत असून २०२४ साली आपली शतकपूर्ती करीत आहे. या निमित्ताने २०२३ २४ या कालावधी मध्ये राज्य आणि देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी योग विषयक वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित