वडगाव मावळ:
शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जात असलेल्या कामगार व मजुर वर्गातील तसेच गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्ञानज्योती फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने शैक्षणिक चळवळ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

त्यातून गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे.शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके व गणवेश मोफत दिली जातात. पण इतर शैक्षणिक साहित्य पालकांना विकत घ्यावे लागते. आर्थिक दुर्बल पालकांना सदरचे साहित्य विकत घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

विद्यार्थ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.ज्ञानज्योती फाऊंडेशन यांच्या “शैक्षणिक चळवळ” उपक्रमाअंतर्गत जि. प शाळा पवळेवाडी केंद्र भोयरे ता.मावळ जि.पुणे येथील गरजू व वंचित विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

प्रामुख्याने कामगार तसेच मजूर वर्गाची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत.यावेळी संस्थेचे सचिव नरेंद्र उमाळे, खजिनदार अमर चव्हाण, मा. राहुल पाटील, प्रमोद पवळे ,तानाजी पवळे मुख्याध्यापक अमोल मेहरकर उपस्थित होते.

error: Content is protected !!