वडगाव मावळ:
अथर्व विजय येवले सोशल फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कान्हे येथे भरड धान्य प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. कान्हे येथे पंचक्रोशीतील ४५  महिलांनी या शिबीरात सहभाग घेतला.

भरड धान्याची संपूर्ण माहिती व त्या पासून तयार करण्यात येणा-या विविध पदार्थाचे या शिबीरात मार्गदर्शन करण्यात आले. महिला सक्षमीकरणा अंतर्गत उद्योजक घडविण्यासाठी हे शिबीर पायाभूत ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

अथर्व विजय येवले फाउंडेशन तर्फे  महिलांना रोजगार तसेच नवनवीन प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षित केले जाते,तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन प्रसंगी कर्ज रुपी रक्कम देऊन त्यांना बाजारपेठ देखील उपलब्ध करून दिली जाते.

निवेदिता शेटे (कृषी तज्ञ नारायणगाव) यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले  सूत्रसंचालन  माया येवले यांनी केले.प्रास्ताविक अक्षय वाहिले यांनी केले.  संजना सातकर     व  अश्विनी शिंदे यांनी स्वागत केले.नेहा सातकर यांनी आभार मानले.

अथर्व विजय येवले फाऊंडेशन ची स्थापना २०१३ सालची असून संस्थापक  विजय नानाभाऊ येवले व माया विजय येवले हे आहेत. प्रमिला भालके, दत्तात्रय येवले  भरत मु-हे, बाळकृष्ण ढोरे,  प्रणाली तारे विश्वस्त मंडळात आहेत .

फाऊंडेशन मार्फत आम्ही गेल्या दहा वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत. शैक्षणिक उपक्रम अनेक शाळावर होतात विद्यार्थ्यांना सहायक उपक्रम राबविले जात आहे.कॉम्प्यूटर शिक्षण,स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन गेस्ट लेक्चर,   गरजू विद्यार्थ्यांना होस्टेल,कामशेत येथे लायब्ररी आहे.

२१  विद्यार्थ्यानी पोलीस भरती ते रेल्वे मंत्रालय सहायक अधीक्षक पर्यत पोस्ट मिळविल्या आहेत. फाउंडेशन मार्फत आरोग्य विषयक कार्यक्रम, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, महिलांचे अनेक प्रश्न सोडवून त्याना समुपदेशन केले जाते. मावळातील अनेक महिलांनी याचा लाभ घेतला महिलांचे काही छोटे व्यवसायही सूरू झाले आहेत .वडेश्वर येथे महिलांनी अनोखा धागा नावाने व्यवसाय उभा केला आहे. कान्हे येथे बटाटा वेफर्स, साते येथे शेवई व खाकरा युनिट, भाजेतील महिला साबण  फिनेल अत्तर तयार करतात,तळेगावातील महिलांनी स्वतःची कंपनी करून विविधपदार्थ व कपडे तयार करत आहेत.

कामशेत येथील महिला मधुरागिनी नावाने मधाचा व्यवसाय करत आहेत .संस्थेमार्फत गेल्याच महिन्यात या यशस्वी उद्योजक महिलांचे व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक समारंभ आयोजित केला होता.ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यात अडचणी आहेत अशा महिलांना रोजगार देण्यासाठी संस्थेमार्फत काही उपक्रम राबवाले जातात,गरजू विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजने अंतर्गत काम मिळवून दिले जात असल्याचे अथर्व विजय येवले सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक सचिव माया येवले यांनी ‘मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन शी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!