टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील विकास कामांची आमदार सुनिल शेळके यांनी पाहणी केली.१५  ऑगस्टला टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील नवीन  पूल व  वडेश्वर येथील पूल वाहतुकीसाठी होणार खुला होणार असल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली.

आंदर मावळमधील टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुल व विविध विकासकामांची मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी ठेकेदार,अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केल्याने कामांना गती मिळणार आहे.

यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.काही कामात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर व ठेकेदार यांची झाडाझडती घेतल्याने सदर कामे वेगाने पूर्णत्वास जाणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामाची व त्याला पर्यायी जोड रस्त्याची पाहणी यावेळी करण्यात आली.कान्हे- टाकवे मार्गावर औद्योगिक प्रकल्पांमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.येथील दळणवळणाचा हा एक मुख्य मार्ग असल्याने उर्वरित काम त्वरित मार्गी लावण्याच्या सुचना देण्यात आल्या.पुलाच्या कामास अडचण निर्माण झालेल्या संबंधित जागामालकासोबत आमदार सुनिल शेळके यांचा सकारात्मक संवाद झाल्याने पुलाच्या पुढील कामास गती मिळेल व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.

नाणे मावळ मधील गेल्या मागील वर्षांपासून लंकेवाडीकडे येणारा पाणंद रस्ता स्थानिक शेतकऱ्यांच्या वादविवादामुळे बंद असल्याने घोणशेत ग्रामपंचायत हद्दीतील लंकेवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर रस्त्याची स्थानिक ग्रामस्थांसह आमदार शेळके यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.स्थानिक पातळीवरील वाद सामंजस्यातुन मिटवुन रस्ता खुला करणेबाबत आमदारांनी विनंती केली असता सदर शेतकऱ्यांनी रस्ता सुरु करण्यास सहमती दर्शविली असून लवकरच लंकेवाडीचा मुख्य रस्ता देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असा विश्वास आमदारांनी दिला.

आंदर मावळ मधील वडेश्वर येथील आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीसाठी १० कोटी ७५ लक्ष निधी उपलब्ध झाला आहे.इमारतीचे काम प्रगतीपथावर असून सद्यस्थितीत दोन स्लॅबचे काम पूर्ण झाले असून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी उर्वरित कामास गती देण्याच्या सुचना दिल्या आहेत.

error: Content is protected !!