लोणावळा:
कैवल्यधाम योग संस्था लोणावळा आणि शिक्षण संचालनालय, क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय आणि गोवा शिक्षण विकास महामंडळ, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शाळेतील मुलांना योग प्रशिक्षण देण्याकरिता गोवा येथील विशेष शाळेतील शारीरिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठी (Physical Education Teachers) तीन दिवसांची परिसंवाद सह कार्यशाळा घेण्यात आली.

( Teachers Training Programme (TTP) Introducing Yoga to Children with Special needs collaboration with Government of Goa ) या नावाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी  सुबोध तिवारी आणि गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष  गोविंद पर्वतकर यांनी दीप प्रज्ज्वलन करून केले.

सुबोध तिवारी यांनी उपस्थित शिक्षकांचे स्वागत केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात  सुबोध तिवारी म्हणाले “या कार्यशाळेचा विशेष मुलांना योगाचा कसा फायदा होईल हा उद्देश आहे. स्वामी कुवलयानंद जी यांनी स्थापन केलेल्या कैवल्यधाम संस्थेस २०२४  साली १०० वर्षे पूर्ण होत आहेत. स्वामीजींच्या तपोभूमीत आपणांस अनुभवात्मक योग शिकण्यास मिळेल.

विशेष मुलांना ‘योग परिचय करून देण्यासाठी सहभागी झालेल्या शिक्षकांना निश्चितच या कार्यशाळेचा  उपयोग होईल  असे तिवारी यांनी  सांगितले.

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली असे नवनवीन उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात प्रगती करीत आहे असे गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर त्यांनी सांगितले.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या  एकूण २७  शारीरिक शिक्षण  शिक्षक (२४ ) आणि शिक्षिका (३ ) शिक्षकांनी आपला परिचय करून दिला,आणि योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प केला.

डॉ. प्रसिदा मेनन, डॉ. रामानाथन, सौ. फोरम शाह यांची “विशेष गरजाधारक मुलांसाठी योग परिचय” या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. डॉ. शरदचंद्र भालेकर यांनी “योग प्रशिक्षणाचा वैज्ञानिक दृष्टीकोन” या विषयावर व्याख्यान दिले.

अंकुर पांडे, श्रीमती दीप्ती मार्कडेय आणि दिव्याभारती यांनी योग प्रशिक्षणाचे ( Asana, Pranayama & Relaxation) धडे दिले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  बर्नार्ड बिट्टों, तनुश्री संदीप,  मीनल डी.,  विधी ओव्हाळ,  गणेश फाटक,  संजय तिवारी,  रिचा पाटील,  किरण लांडगे,  बंडू कुटे , राधिका रायकर, राजेश सरकार आणि  विप्रा चौहान यांनी विशेष सहकार्य केले.

ज्ञानदीप विद्यापीठाचे माजी प्राध्यापक तसेच जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्यावर डॉक्टरेट केलेले सन्मानीय  बिशप थोमस डाबरे ( Bishop Thomas Dabre) यांच्या शुभहस्ते कार्यशाळेत सहभागी झालेल्या शारीरिक शिक्षण शिक्षक व शिक्षिकांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. सहभागी शिक्षकांनी अभिप्राय व्यक्त केले. नगई विदटो यांनी आभार मानले.

error: Content is protected !!