पवनानगर:
येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी प्रियंका सुखदेव घारे यांची बिनविरोध निवड झाली.मावळते  सरपंच जयवंत घारे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने  रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.

मंडलाधिकारी  मारूती चोरमाले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी प्रियंका घारे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी चोरमले यांनी घारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

घारे यांची बिनविरोध होताच समर्थकांनी भंडारा गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. घारे यांनी ग्रामदैवताच्या मंदिरात जावून दर्शन घेतले. गावकामगार तलाठी जाधव, ग्रामसेवक भरत शिरसाट यांनी निवडणूक सहाय्यक म्हणून काम पाहिले.

उपसरपंच  सिताबाई रमेश भिलारे, ग्रामपंचायत सदस्य  जयवंत सुदाम घारे,  गोरक्षनाथ गणपत घारे,  संतोष घारे, सिमा शेडगे, मंदाबाई उत्तम घारे उपस्थित होते. महादेव महाराज घारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पाडली.

माजी  सरपंच  सुदाम घारे, माजी सरपंच विकास घारे, माजी सरपंच शाहिदास भिलारे, माजी उपसरपंच आनंद घारे, रा. कॉ. काले. गण. अध्यक्ष रोहिदास घारे, ज्ञानेश्वर घारे, तंटामुक्ती अध्यक्ष  अनंता घारे, माजीसरपंच संतोष ओझरकर, राजेंद्र घारे, नामदेव घारे, दिनकर घारे, नितीन घारे, रा.काँ. अध्यक्ष.  सुधिर घारे, श्री. प्रकाश भिलारे, पवन मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  लाला गोणते, अंकुश कारके, गोरख खराडे,  रंगनाथ घारे, भाऊ भिलारे, रामदास कदम उपस्थित होते.

दरम्यान, मावळचे आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते सरपंच घारे यांचा सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित सरपंच प्रियंका घारे म्हणाल्या,” स्थानिक पातळीवरील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.विशेषतः महिला सक्षमीकरणावर अधिक भर देणार आहे.

error: Content is protected !!