टाकवे बुद्रुक:
मोकाट जनावरांना आळा घालावा, अशी मागणी माळेगाव खुर्द येथील ग्रामस्थांनी केली आहे. धूळवाफेवर पेरणी केलेल्या भात रोपांची नासाडी होऊ नये,यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. तर मोकाट जनावरांवर बिबट्याने हल्ला करू नये यासाठी खबरदारी म्हणून जनावरांना मोकाट सोडू नये हा देखील या मागणीचा हेतू आहे.

माळेगाव खुर्द येथील शेतकऱ्यांची जनावरे पावसाळा सुरु झाला तरी अजूनही दिवस रात्र मोकाट सोडलेली आहे. या जनावरांना  गुरख्यांची वळणे नाहीत.जनावरे संभाळली की ती मोकाट राहणार नाहीत,सध्या ही गुरे- ढोरे शेतकऱ्यांनी नुकत्याच पेरणी केलेल्या शेतातील बियाणाची तुडवण करतात, सारे, वाफे विसकटतात त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.

तसेच ही जनावरे दिवसभर गावाभोवती वनवण भटकत उकिरडे चघळतात त्यातून त्यांच्या पोटात प्लास्टिक जात आहे, तसेच गटरीचे घाण सांडपाणी पितांना दिसतात. त्यातून अनेक जनावरे आजारी होतात. तरीही येथील गोपालकांना आपल्या जनावरांची अजिबात तमा नाही.      

आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये शेतकरी आपली गुरे मोकाट सोडत नाहीत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात देखील बागायती पिके घेता येतात. शेताची राखण करण्याची गरज भासत नाही. कृपया स्थानिक प्रशानाने व तालुका प्रशासनाने यात लक्ष घालावे व तसे आदेश काढून अशा मोकाट जनावरांचा सर्व ऋतुत बंदोबस्त करावा अशी येथील इतर शेतकऱ्यांची मागणी आहे.

पोलीस पाटील जालिंदर मेठल, शिवराम सुपे, शंकर तळपे, वसंत मरभळ, माजी सभापती शंकरराव सुपे, किसन सुपे, भाऊ बोऱ्हाडे, तुकाराम बोऱ्हाडे, दासोपंत ठाकर यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. पूर्वी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी गावोगावी कोंडवडा असाचा. पिकाची नुकसान करणा-या जनावरांना कोंडवड्यात ठेवले जायचे, संबंधित शेतकरी ग्रामपंचायतीकडे जनावरांचा दंड अदा करून जनावरे सोडवून घेऊन जात, दंडाची रक्कम कमी असली तरी दंड भरण्याचा अवमान होऊ नये यासाठी शेतकरी बांधव सहजासहजी मोकाट जनावरे सोडायला धजावत नव्हते. काळाच्या ओघात कोंडवडा बंद झाले.

त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले, मोकाट जनावरे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात शेतीचे नुकसान करीत आहे.या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वादविवाद होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. २६ मे ला तळपेवाडी गावातील शेतकरी  गिरजू गंगाराम लोहकरे यांच्या गोठ्यात वाघ घुसून एक बैलजोडी आज पहाटे वाघाच्या हल्यात दुर्देवी मृत्यू झाला होता.

error: Content is protected !!