वडगाव मावळ:
आंदर मावळातील कांब्रे येथे दरड कोसळण्याची भीती कायम आहे.चार दिवसापूर्वी गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या पुरातन गुहेजवळ लँड स्लाइडिंग झाले आहे,या लॅड स्लाइडिंगची भीती गावक-यामध्ये आहे.प्रशासनाने गावक-यांना या अनुषंगाने प्रशिक्षण द्यावे तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते.खबरदारीचे उपाय म्हणून सुचना द्याव्यात अशी मागणी होत आहे.
चार दिवसापूर्वी भूस्ख्लन झाले असून या परिसरात कोणीही अधिकारी,लोकप्रतिनिधी फिरकला नसल्याचे खंत व्यक्त होत आहे.मावळ ॲडव्हेंचर चॕरीटेबल ट्रस्ट कान्हे आणिहमावळ ॲडव्हेंचर ॲनिमल रेस्क्युटिम मावळचे विश्वनाथ जावळीकर.यांनी या घटनेची माहिती सबंधित विभागाला दिली आहे.
वडगाव मावळ पोलीस स्टेशन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला जावळीकर यांनी या आशयाचे मेल करुन निवेदन दिले आहे. गुहे जवळष पर्यटक येण्याची शक्यता नाकरता येत नाही. पर्यटकांच्या सुरक्षेबाबत उपाय योजना करणे गरजचे आहे.
जेणेकरून कुठलाही पर्यटकाला इजा किंवा त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यटकांच्या जीवास धोका असलेले मार्ग बंद करून तिथे ठळक दिसतील असे फलक लावणे जरुरी आहे,अशी मागणी किसन शेलार यांनी केली.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान