जग जिंकण्यापेक्षा मन जिंकूया!
होय मित्रांनो,
मी जगात केवळ जगण्यासाठी नव्हे तर जग.. जिंकण्यासाठी आलेलो आहे. पण त्यासाठी सर्वप्रथम एक महत्त्वाची अट आहे की, एक वेळ जग जिंकता आलं नाही तरी चालेल पण–माणसाचं मन मात्र जिंकता आलच पाहिजे.
त्यासाठी एक साधा सरळ उपाय आहे की– आपल्याला समोरच्या व्यक्तीचं कौतुक करता आलच पाहिजे! कारण केवळ माणूसच नाही तर प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा आपल्या स्तुतीचा भोक्ता असतो! आपण कुठल्याही देवाची आरती म्हणतो म्हणजे मित्रांनो त्यात काय असतं तर त्यात फक्त त्या-त्या देव-देवतांची स्तुतीच केलेली असते.
ही आपली रोजची उदाहरणे आहेत! अर्थात देवाची आरती करणं सोपं असत हो पण माणसाची कौतुकाच्या शब्दांनी आरती करण आणि तीही कुठल्याही स्वार्थाशिवाय अमलात आणण हे तितकंसं सोपं नाही! अर्थात हे ज्याला जमलं त्यानेच माणसं केवळ जोडली नव्हे तर ती जिंकली आहेत हे शाश्वत सत्य आहे.
यासाठी तुमचं मन शुद्ध असायला हव! मित्रांनो –एक वेळ आपला खिसा भरलेला नसेल तर तेही चालेल पण- आपलं मन नेहमी श्रीमंत आणि समुद्रासारख विशालच हव! त्यात सर्वांसाठी जागा असलाच हवी! याची जाणीव ज्याला झाली की तोच सारं जग जिंकू शकतो हेच त्रिवार सत्य आहे! असं म्हणतात की– माणसाचं मन हे एखाद्या सुंदर बागेसारख असतं.
त्यासाठी त्या बागेतील अनावश्यक तण काढून टाकणं आणि त्याप्रमाणे मनाच्या बागेची नियमित मशागत करणे हीच खरी गरज आहे! कारण ज्यांनी आपल्याला त्रास दिला- वेळोवेळी केलेल्या अपमानाने आपल्या काळजाला घर पाडलीत! रागाची- विखारी तणांची पेरणी केली ती वेळीच उपटून त्या मनाची मशागत ज्यांनी केली त्यांनाच आपल्या अंतकरणात समोरच्या व्यक्तीच्या कौतुकाची बाग निर्माण करण सहज शक्य असत.
म्हणूनच मित्रांनो- एकदा का हे तंत्र ज्याला जमलं त्यालाच माणसाचं मन जिंकण्याच मंत्र गवसलं असच समजायला काहीही हरकत नाही! मित्रांनो म्हणून आजपासून नव्हे आतापासूनच असच आपण ठरवूया की– समोरच्याला असं वाटता कामा नये कि आपण त्याची खोटी स्तुती करीत आहोत याचं भान ठेवूनच त्याच्या रंग रूपाचं!
त्याच्या कामाचं आणि त्याने मिळवलेल्या यशाच अशा अनेक गोष्टींच कौतुक न विसरता करणे म्हणजेच त्याला जिंकणे हा तुमचा स्वभाव बनेल आणि तेच तुमचं व्यक्तिमत्त्व जनसामान्यांच्या हृदयामध्ये कोरल जाईल! अर्थात हे काही आपण समजतो आहे तेवढं सोपं नाही त्यासाठी आपल्या मनाला आपणच वेसण घालणं तेवढच आवश्यक आहे!
मित्रांनो–
आजच चिंतन निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचलेल आहे म्हणून आज इथेच थांबतो.
( शब्दांकन- ला.डॉ.शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित