मुंबई:
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी भामा आसखेड धरणग्रस्तांना पुनर्वसना संदर्भात प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

महसूलमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील  यांची भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी भेट घेवुन३० वर्ष पासून प्रलंबीत असलेल्या पुनर्वसनाचे प्रश्ना संदर्भात  सविस्तर चर्चा केली .

विखे पाटील यांनी  तत्काळ दखल घेत भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या च्या पुनर्वसन प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले .तसेच धरणग्रस्त  शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न समजावून घेवून पर्यायी जमीन वाटपाच्या प्रश्नांवरयेणाऱ्या  अडचणींवर मार्ग काढण्याच्या सूचना  प्रशासनाला दिल्या .

  सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांनी विखे पाटील यांचे  आभार मानले. लवकरच भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा  धरणग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली .
 
यावेळी देवदास बांदल,गणेश जाधव,सुनील डांगले , किसन नवले, सुखदेव गवारी,आनंद आवारी,अण्णा देवाडे, सप्नील येवले,भाऊसाहेब शिंदे, शांताराम शिवेकर,, अंनथा वझरकर  धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!