लोणावळा : 
मुंबई-पुणे महामार्गाला लोणावळ्याजवळ ऑइल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागली.या अपघाताने वाहतूक कोंडी झाली, आगीच्या ज्वाळा दूर पर्यंत दिसल्या,मदत कार्याला वेग आला. तर माणुसकीचे दर्शन घडले.एका टँकरने चार जणांचा बळी घेतला. या अपघातातील दोन जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ही आग  भयंकर होती की,घाटातून दूर पर्यंत आगीचे लोट दिसत होते.घटनास्थळी पोलिस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारीवर्गाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जीवाचे रान केले. हा अपघात नेमका कसा झाला या बाबत माहिती मिळू शकली नाही.पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटातील कुणे पुलावर भीषण अपघात झाला आहे.

केमिकलची वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन मोठा अपघात झाला तोच टँकरने पेट घेतला. या अपघातामुळे टँकरमधील केमिकल रस्त्यावर सांडलं आणि मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर केमिकल सांडल्याने एक दुचाकीस्वार यावरून घसरला.

यामध्ये दुचाकीवरील १२ वर्षांचा मुलगा होरपळून ठार झाला तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुर्घटनेत टँकर चालकही गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. या घटनेचे फोटोही सध्या समोर आले आहेत. तर पोलीस आणि मदतकार्य घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामध्ये आतापर्यंंत एकूण ४ ठार आणि ३ गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!