खंडाळा:
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात एका टँकरला भीषण आग लागली आहे. या आगीची झळ पुलाखालील गाड्यांनाही बसली असून आगीचे लोळ लांबूनही दिसत आहेत.ही घटना कुणेगाव पुलाजवळ घडली आहे.
पुलाखाली दोन ते तीन कार आगीच्या कचाट्यात सापडल्या आहेत. यामध्ये अनेकजण जखमी किंवा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. टँकर ने पेट घेतल्यानंतर त्यातील केमिकल पेटत पुलावरून खाली पडले. तीन जण गंभीररित्या जळाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
चार ते पाच अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. अॅम्बुलन्सही आल्या आहेत. परंतू आग मोठी असल्याने मदतकार्य करण्यात अडथळे येत आहेत. गेल्या तासाभरापासून ही आग पेटलेली असून दोन्ही बाजुची वाहतूक थांबविण्यात आली आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळवली जात आहे. एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर अपघातात काही जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित