तळेगाव दाभाडे:
संस्कृत संभाषण कौशल्य शिबिराचा सांगता समारंभ संपन्नस झाला. दिनांक एक जून ते १० जून या काळात सरस्वती विद्यामंदिर येथे संस्कृत भारती ,सरस्वती विद्यामंदिर,आणि ब्राह्मण सेवा संघ ह्याच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर संपन्न झाले.
पंधरा वर्षे वयाचे विद्यार्थी ते ६० वर्ष वयाच्या स्त्री-पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेतला!अतिशय उत्साहात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने या समारंभाची सुरुवात झाली! या समारंभाचे वेगळेपण असे होते की- स्वागतापासून तर आभारापर्यंतचा संपूर्ण कार्यक्रम संस्कृत भाषेत शिबिरार्थींनी सादर केला.
जवळजवळ दहा विद्यार्थ्यांनी भाषणातून आणि संस्कृत नाटिकेमधून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात! या शिबिराच्या मुख्य संयोजिका मंजुषा तेलंग यांनी आपल्या प्रास्ताविकात शिबिरामागील आपली वैयक्तिक आणि या संस्थेची भूमिका स्पष्ट केली. सोनल जोशी यांनी सर्व मान्यवरांचा परिचय अतिशय मोजक्या शब्दात करून दिला.
प्रमुखपाहुणे ज्येष्ठ लेखक वक्ते डॉक्टशाळिग्राम म भंडारी यांनी सर्वप्रथम या उपक्रमाच्या संयोजकांचे व शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन केले. डॉक्टरांनी त्यांच्या शालेय जीवनात शिकवलेल्या सर्व सुभाषितांचा आधार घेऊन संस्कृत भाषेचं व्यक्तिमत्व विकासात किती महत्त्वाचं स्थान आहे हे अनेक काव्यपंक्ती शेरोशायरी आणि दृष्टांत देऊन उपस्थिताना अवगत केले.
संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या राघवेंद्र देशपांडे यांनी आपल्या ओघवत्या संस्कृत भाषेतून सर्वांशी संवाद साधला. प्रमुख अतिथी- प्रांत शिक्षण प्रमुख गोविंदराज कासूल आणि संस्थेचे ग्रामीण विभागातील संयोजक डॉ.रामचंद्र देशमुख यांनी या उपक्रमाच अभिनंदन केलं आणि संस्थेच्या भविष्यकालीन विविध उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष सुधाकर देशमुख- सरस्वती विद्यामंदर संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड- उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी- संचालक प्रकाश जोशी यांनीही संस्कृत भारती संस्थेच्या या अभियानास मनापासून शुभेच्छा व्यक्त केल्या!हा उपक्रम यशस्वी करण्यास संस्कृत भारती तळेगाव विभागाच्या प्रमुख मंजुषा तेलंग- सोनल जोशी- ज्योती मुंगी आणि वसुधा साठे यांनी विशेष परिश्रम घेतलेत.
तळेगावातील प्रसिद्ध योग आणि संस्कृत शिक्षिका कवियत्री ज्योती मुंगी यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे संस्कृत मधूनच आभार मानल्यानंतर या समारंभाची सांगता झाली.
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा