श्री. पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने उत्साहात प्रस्थान
वडगाव मावळ:
जगदगुरु श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडींचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे आनंदाने भक्तीपूर्वक वातावरणात प्रस्थान झाले.

वारकरी संप्रदायातील भाविक, शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी तसेच नागरिक व महिला भगिनींनी विणापूजन करत सर्वांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. आणि  तद्नंतर प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकत्रित सहभागी झाले होते.

ग्रामदैवत श्री.पोटोबा महाराज मंदिरास प्रदक्षिणा घालून टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूनामाच्या जयघोषात, भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, मृदुंगमणी, टाळकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी भक्तिमय वातावरणात फुगडीचा फेर धरत दिंडीचे बाजारपेठेतून प्रस्थान झाले. यावेळी शहरातील जैन समाजाच्या वतीने पायी दिंडीवर फुलांची उधळण करत एकात्मतेचे दर्शन घडवले.

यावेळी श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडीचे पदाधिकारी, शहरातील नागरिक व पंचक्रोशीतील भाविक, भगिनी, जैन बांधव, पत्रकार बांधव, मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका, सदस्या, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सोसायटीतील मित्रपरिवार, हितचिंतक आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नगराध्यक्ष मयूर ढोरे, दिंडी अध्यक्ष महेंद्र ढोरे यांनी स्वागत केले. मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!