


कामशेत:
नागरी सुविधा केंद्र हे जनसामान्यांच्या सेवेचे केंद्र ठरावे, असा आशावाद आमदार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केला. कामशेत येथे मावळ तालुका युवक अध्यक्षचे माजी अध्यक्ष गणेश काजळे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या कामशेत येथे नागरी ई सुविधा केंद्राचे उद्धघाटन आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी झालेल्या सभेत धंगेकर बोलत होते.
यावेळी भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, माजी राज्यमंत्री मदन बाफना,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,माजी नगरसेवक कैलास दांगट, यादेवेंद्र खळदे, महेश ढमढरे ,पृथ्वीराज पाटील,किरण गायकवाड, निखिल कवीश्वर, मुळशी तालुका अध्यक्ष गंगाराम मातिरे,राजेश वाघूले,यशवंत मोहोळ,प्रमोद गायकवाड, दिपक हुलावळे, भरत येवले,सुभाष जाधव,नामदेव शेलार, नंदुशेठ वाळुंज, प्रकाश आगळमे,विजय सातकर,विलास मालपोटे,राजाराम शिंदे,मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्ष तुकाराम गायकवाड,महादू सातकर,माऊली जांभूळकर, टाकवे सोसायटीचे अध्यक्ष योगेश गायकवाड उपस्थित होते.
आमदार संजय जगताप, आमदार सुनिल शेळके यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या मावळ तालुका दिंडी समाज दिंडीला ५० वर्ष पूर्ण झाल्या बदल विणेकर भाऊसाहेब टाकळकर यांचा सन्मान करण्यात आला.गणेश काजळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुशांत बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले.
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे




