महाराष्‍ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरण विभागामार्फत आयोजीत माझी वसुंधरा स्‍पर्धेत लोणावळा शहराचा दुसरा क्रमांक

प्रतिनिधी: श्रावणी कामत
लोणावळा :
महाराष्‍ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरण विभागामार्फत आयोजीत माझी वसुंधरा 3.0 स्‍पर्धेत 50 ते 1 लाख या गटात संपूर्ण राज्‍यात लोणावळा शहराने दुसरा क्रमांक पटकावून ४ कोटीचे बक्षीस प्राप्‍त केले तसेच संपूर्ण राज्‍यात भुमी या तत्‍वात सर्वप्रथम येत रु.1.50 चे पारितोषीक  असे एकूण 5.5 कोटीचे पारितोषिक पटकावून दुहेरी मुकूट परिधान केलेला आहे. 

या बक्षिस वितरण समारंभाचे वेळी महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री  एकनाथ शिंदे साहेब, विधानसभा अध्‍यक्ष  राहूल नार्वेकर , राधाकृष्‍ण विखे पाटील ,पर्यावरण व वातावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे साहेब यांचे शुभहस्‍ते हा पुरस्‍कार लोणावळा नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी पंडीत पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माज़ी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , व अधिकारी कर्मचारी यांनी स्‍वीकारला. 

या दुहेरी यशाबद्दल व सलग दुस-या वर्षीही सातत्‍य राखलेबद्दल संपूर्ण शहरातून अभिनंदनाचा वर्षाव लोणावळा नगरपरिषदेवर होत आहे.

error: Content is protected !!