
आंबी:
शिक्षकाने विद्यार्थ्यांला दिलेली शाबासकीची थाप जीवनात अमुलाग्र बदल घडविते असा विश्वास डॉ.सायली गणकर यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे आणि डॉक्टर डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आंबी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांची जिल्हास्तरीय विषय शिक्षक कार्यशाळेचे उद्घाटन समारंभ पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी झालेल्या सभेत गणकर बोलत होत्या.
डॉ. डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या उपकुलगुरू डॉ. सायली गणकर यांच्या हस्ते पंचायत समिती मावळचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे ,शिवाजी किलकिले , अरुण थोरात माजी उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले सचिव शांताराम पोखरकर जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष मधुकर नाईक सचिव प्रसाद गायकवाड उपाध्यक्ष राजेश गायकवाड मुंबई शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे मुख्याध्यापक संघाचे सन्माननीय सदस्य कुंडलिकराव मेमाणे सुरेश कांचन उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाचे संयोजन मावळ तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे सचिव विकास तारे पुणे जिल्हा मुख्याध्यापक आणि पुणे जिल्ह्यातील सर्व विषयांचे तज्ञ अध्यापक या ठिकाणी उपस्थित होते .
डॉ सायली गणकर म्हणाल्या,” शिक्षकांनी दिलेली शाबासकीची थाप विद्यार्थ्यांचे जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडवित असते विद्यार्थ्यांना दिलेला विश्वास हा त्याच्या जीवनातील बदलाचा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांनी ज्ञानी असावे चिंतन , ध्यान करावे त्याने अनुभवाची माळ जोडण्यासाठी नेहमी प्रयत्न करावा .
त्या ठिकाणी आनंदाने शिकवावे विद्यार्थ्याकडे पाहत असताना शिक्षकांने आदर्श आणि आशावादी बनावे निंदा नालस्ती दुष्णे पटकन विसरण्याची किमया ही शिक्षकाला साधता येते प्रत्येक गोष्ट जागृतीने करावी त्यामुळे आपणामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळं असं नातं निर्माण करण्यात यावे. जीवन आनंदाने कसे जगावे हे मुलांना संस्कारातून आपल्या अनुभवातून आणि आपल्या विचारातून सांगितले जावे.
यावेळी गटशिक्षणाधिकारी वाळुंज म्हणाले,”. विद्यार्थ्यांनी कशासाठी शिकले पाहिजेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा ब्रेन वॉश करण्याचं काम हे शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात आणि सर्वांनी मिळून संस्कारक्षम विद्यार्थी घडवावेत.
या कार्यशाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या साठी नवीन शैक्षणिक धोरण प्रश्नपत्रिका संरचना व आराखडा , सेवा जेष्ठता आणि मूल्यांकन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शक यांच्या साह्याने मार्गदर्शन करण्यात येणार असून दोन दिवसाच्या या कार्यशाळेमध्ये चार सत्रामध्ये या कार्यक्रमाचे विभागणी केली आहे.
मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधीकारी बाळासाहेब उभे,राजेश गायकवाड, विठ्ठल माळशिकारे,विकास तारे,नारायन पवार,प्रतिभा चौधरी,ललीता कांबळे,रेखाताई परदेशी, प्रा.चेतन मोरे,प्रा.संदिपकूमार आवचार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांनी सूत्रसंचालन मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड यांनी तर आभार विद्या समितीचे सचिव भानुदास रिठे यांनी मानले.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




