वडगाव मावळ :
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या अध्यक्षपदी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य नथुशेठ वाघमारे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी वाघमारे यांना नियुक्तीचे पत्र वडगाव मावळ येथील पक्षाचे कार्यकारिणीचे सभेत दिले.
शवाघमारे हे शिरगाव शिर्डी येथील रहिवासी असुन मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत भटक्या विमुक्त गटातून प्रचंड मताधिक्यानी निवडुन आलेले आहेत. त्यांचा नैसर्गिक सेन्द्रिय खत विक्रीचा मावळ आणी पुणे जिल्ह्यात व्यवसाय आहे.
मावळ तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजाचे संघटन करणे आणी त्यांना शासनाच्या सवलतीचा विशेष लाभ मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु असे वाघमारे यांनी नियुक्ती नंतर सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, आमदार सुनिल शेळके यांनी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले.