टाकवे बुद्रुक:                         
टाकवे बुद्रुक  ग्रुप ग्रामपंचायत  वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा सन्मान करण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गावांमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या टाकवे बुद्रुक येथील मंगल तानाजी टेमगिरे व बेलज येथील सपना पांडुरंग वाजे यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी  सरपंच  सुवर्णा बाबाजी असवले, सदस्य  अविनाश असवले, सदस्या आशा मदगे,पोलिस पाटील  अतुल  असवले, माजी उपसरपंच  स्वामी जगताप, दिलीप आंबेकर, ग्रामविकास अधिकारी  एस.बी.बांगर व अंगणवाडी सेविका.चंद्रभागा कुटे, अंगणवाडी सेविका.कामिनी पिलाणे तशाच गावातील विविध पदावरती काम करणाऱ्या महिला भगिनींनी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!