वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा मोहिमेअंतर्गत तिकोना किल्यावर स्वच्छता अभियान
पवनानगर:
वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा मोहिमेअंतर्गत किल्ले तिकोना येथे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून मावळातील किल्ले व पर्यटनस्थळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले .
तिकोना येथे सकाळी ६.३० वाजता या मोहिमेला सुरुवात केली गडावरील सर्व परिसर व पायवाटेवर झालेल्या कचरा गोळा करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक,आय.पी.एस.अनमोल मित्तल, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सीताराम डुबल,सचिन रावुळ,आकाश पवार,भारत भोसले, पोलीस कान्स्टेबल विजय गाले, संतोष शेळके, यशवंत मोहोळ, उपसरपंच ज्ञानेश्वर मोहोळ, पवना कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मोहोळ, दत्तात्रय ठाकर, अनंता वर्वे, सरपंच शाहिदास निंबळे, पोलिस पाटील सुनील कालेकर, तानाजी काळे, अनंता खैरे व पवनानगर परिसरातील पोलीस पाटील, शिवदुर्ग टीम,क्लीन स्टार ,पवना कृषी पर्यटन विकास संस्था पदाधिकारी, तिकोना गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक म्हणाले ,” या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असुन याचबरोबर महिला सुरक्षा,वाहतुक सुरक्षा, सायबर सुरक्षा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे परिसरातील शांतता राखणे, भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले तसेच आगामी काळात व्यसनमुक्तीसठी काम करणार असल्याचे सांगितले ४ जुन रोजी लोणावळा शहरात व्यसनमुक्ती अभियान साठी ५ किलोमिटर रनिंग मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले प्रस्ताविक पोलीस पाटील अनंता खैरे यांनी तर आभार पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी मानले.