मुसीबते दिल के आरमा आजमाती है ! सपनो के पडदे निगाहो से हटती है!
ठोकरे तो इंसाको चलना सिखाती है!
होय मित्रांनो,
संकट ही खरोखरच- उज्वल भविष्याची जी आपण स्वप्न बघत असतो ती पूर्णत्वास नेण्यास आपण सक्षम आहोत का? लायक  आहोत का याचीच परीक्षा घेत असतात! म्हणून आपल्या मार्गावर संकट आलीच पाहिजेत.

कारण- स्वप्न तर प्रत्यक्ष प्रत्येक जण बघत असतो कारण तो त्याचा अधिकारच आहे!पण- तीच स्वप्न पूर्णत्वास येत असताना जे संकटांना यशस्वीपणे सामोरे जातात तेच आपली स्वप्न साकार करू शकतात! संपन्न करू शकतात.

कारण– मित्रांनो विचार करा की– कुठलंही संकट- संघर्ष न येता आयुष्य सरळ असं चाललेलं आहे! आणि अशा वेळी अचानक एखाद्या स्वप्नाळू व्यक्तीला कठीण परिस्थितीला- संघर्षाला-  अचानक सामोरं जावं लागत आहे! एवढेच नव्हे तर त्याला अशा परिस्थितीत कुठलीही मदत मिळत नाहीये! त्याची कटुता तर त्याला येणारच!

अशावेळी मित्रांनो– निराशे शिवाय त्याला दुसर काहीही सुचत नाही! त्यातून  त्याला यशस्वीपणे  बाहेर पडायचं असेल तर– फक्त आणि फक्त सकारात्मक  विचारच त्याला निश्चित असा मार्ग दाखवू शकत! कसं ते आपण आत्ताच पाहूया!मित्रांनो– एका गाढवाची गोष्ट आपल्याला माहिती आहे!.

गाढव म्हातारा झालेला आहे! त्याचा मालकाला शून्य उपयोग होतो आहे!  कंटाळून मालकाने त्याला पुरून टाकण्यासाठी एक  खड्डा खणलेला आहे! त्या गाढवाला त्या खड्ड्यात पुरून टाकण्यासाठी आपल्या सर्व परिवाराला तो मालक त्या खड्ड्यातील गाढवावर माती टाकण्याचा आदेश देतो आहे.

त्याच्या आदेशानुसार मित्रांनो- त्याचा सर्व परिवार माती टाकायला सुरुवात करतो आहे! अशावेळी ते खड्ड्यातील गाढव असा विचार करतो आहे की -मी त्यातून बाहेर पडू शकत नाही पण ही माझ्यावर पडणारी माती मी बाजुला होऊन झटकू शकतो!  आणि हळू हळू खड्डा भरल्यावर सहज बाहेर पडू शकतो! माझा जीव वाचवू शकतो.

असा सकारात्मक विचार करून प्रत्यक्ष ती कृती करण्यास ते गाढव प्रवृत्त होतं!  आणि- मित्रांनो त्याचा परिणाम असा होतो की-  गाढव सहीसलामत त्या खड्ड्यातून बाहेर पडतो आहे! मित्रांनो– ही छोटीशी गोष्ट पण– आपल्याला खूप काही सांगून जाते.

कारण आपण आपल्या सर्व संघर्षाचा- संकटांचा असा सकारात्मक विचार करून जर योग्य वेळी योग्य तो निर्णय घेत असाल तर –आयुष्यात आपण कधीच हार मानणार नाही! कारण ज्याप्रमाणे त्या गाढवाने सहकार्यात्मक विचार करून प्रत्यक्ष प्रतिकूल परिस्थितीवर जशी मात केली तशीच जर आपण विचारांची दिशा  बदलून त्याप्रमाणे कृती केली तर निश्चितच या संघर्षाला- संकटाला अत्यंत यशस्वीपणे तोंड देण्यासाठी सिद्ध होऊ शकतो!  हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणून मी इथेच थांबतो.

(शब्दांकन – ला. डॉ. शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!